लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी रुपेरी पडद्यावर ! पायवाटाची सावली २३ मे रोजी प्रदर्शित !!
schedule07 May 25 person by visibility 44 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लेखकाचा खडतर प्रवास ‘पायवाटाची सावली’ या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा २३ मे २०२५ पासून प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार, तंत्रज्ञांची टीम कोल्हापुरात आली होती. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा सिनेमा वेगळया धाटणीचा आहे. लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाचे बहुतांश चित्रीकरण कोल्हापूर जिल्ह्यातील पडवळवाडी परिसरात झाले आहे. या सिनेमात कोल्हापूरच्या कलाकारांचा सहभाग आहे.
'मीना शमीम फिल्म्स' प्रस्तुत 'पायवाटाची सावली' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू 'मीना शमीम फिल्म्स'ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे. तर समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आणि सिंडीकेशनचे काम केले आहे. सिनेमात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत. यामध्ये कोल्हापूरचे कलाकार संजय टिपुगडे यांची भूमिका आहे. तर अमर मठपती यांनी निर्मिती व्यवस्थापनाची बाजू सांभाळली आहे.
या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक - लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत अस म्हटलं की, “एका गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो. तेथील लोक पाण्याविणा आपला उदरनिर्वाह कसा करतात. त्यांची पाण्याप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे. आयुष्यात हरलेला व स्वतःला निराशेच्या डोहात बुडवलेल्या एका लेखकाची दुर्दशा यात मांडली आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल. करतो. तसेच काहींना अस वाटेल की हे माझ्यासोबत देखील घडल आहे. काहीना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तवाची देखील प्रचिती होईल. सर्वांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहावा.”