Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिकमहादेव डावरे यांचे कार्य  शिक्षकांना दिशादर्शक : भरत रसाळेमहिला - बाल कल्याण देणार मशरुम-आटाविरहीत व्हीट ब्रेड तयारचे प्रशिक्षणडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदानगोकुळच्या माजी चेअरमनांची टोलेबाजी ! जुळे भाऊपासून बापापर्यंत उपमा, जिल्ह्यातील नेत्यांचाही चिमटा ! !शिक्षण विभागातील अकरा अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोल्हापूर - सांगलीतील अधिकाऱ्यांचा समावेश श्रीपूजक मंडळ - समिधा प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जाहिरात

 

शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी विराज पाटील

schedule01 Jul 26 person by visibility 161 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी विराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे यासंबंधीची माहिती देण्यात आली. माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर जिल्हाप्रमुखपद रिक्त होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखपदाच्या नियुक्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून अधिकृत घोषणा झाली. विराज पाटील हे गेली अनेक वर्षे संघटनेत सक्रिय आहेत. करवीर तालुकाप्रमुख म्हणून काम केले आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ते सक्रिय आहेत. नागरी प्रश्नावर आंदोलने केली आहेत. पाचगावच्या पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.  दरम्यान इंगवले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख कोण याकडे लक्ष लागले होते. जिल्हाप्रमुखपदासाठी विराज पाटील, अवधूत साळोखे, राजू यादव, तानाजी आंग्रे अशी नावे चर्चेत होती. विराज पाटील हे शिवसेना उपनेते संजय पवार यांचे समर्थक मानले जातात. ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. दरम्यान शिवसेनेतील सध्याची गटबाजी, नेतेमंडळीत विखुरलेले कार्यकर्ते, समन्वयाचा अभाव पाहता साऱ्यांना सोबत घेऊन काम करताना पाटील यांची कसोटी लागणार इतके निश्चित.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes