Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मीना शेंडकर बदली आदेशाच्या प्रतिक्षेत, अशोक घुगेंच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभारकोल्हापूर फर्स्टच्या व्यासपीठावर सन्मान कर्तबगारांच्या कर्तृत्वाचा ! मुलाखतीतून उलगडली यशाची कहाणी ! !पी आर पाटील  म्हणजे  जिव्हाळा जपणारा माणूस : भरत रसाळेसर्किट बेंचकडून अवसायनातील दूध संस्था पात्र, मतदानाचा मार्ग मोकळाउपमहापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशदूरशिक्षण-ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास दहा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढस्वाभिमानीच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक, ठरली आंदोलनासह निवडणुकीची रणनिती  पंधरा ऑगस्टला प्रत्येक शाळेत असाक्षरमुक्त गाव शपथ अभियानलिंगायत समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक, मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापुरात आरसीसी क्लासेसची तोडफोड, शिवराज मोटेगावकरच्या विरोधात एनएसयुआय आक्रमक

जाहिरात

 

कोल्हापुरात आरसीसी क्लासेसची तोडफोड, शिवराज मोटेगावकरच्या विरोधात एनएसयुआय आक्रमक

schedule11 Aug 26 person by visibility 1019 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकरच्या विरोधात कोल्हापुरात एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. एनएसयुआयचे  सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 11 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापुरात जोरदार आंदोलन झाले.  जिल्हाध्यक्ष चव्हाण व अन्य कार्यकर्ते, बसंत - बहार टॉकीज रोड परिसरातील मोटेगावकरच्या  आरसीसी  क्लासेसमध्ये पोहोचले. त्यांनी, मोटेगावकरच्या विरोधात जोरदार घोषणा देत आरसीसी क्लासेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन झाले.क्लासेसची तोडफोड करत आरोपीवर कठोर कारवाई करावी. क्लासेस बंद करून,मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे मागणी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे. तसेच भ्रष्ट आरसीसी क्लासेस बंद करून विद्यार्थ्यांची फी परत करावी. शिवाय नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकरला कडक शिक्षा  देण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण व कार्यकर्त्यांनी केली. नीट पेपर फुटी प्रकरणाची सखट चौकशी करावी, दोषी व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे, आरसीसी क्लासेस ची मान्यता रद्द करावी यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले होते. क्लासेसच्या समोर निदर्शनेही केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes