Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मीना शेंडकर बदली आदेशाच्या प्रतिक्षेत, अशोक घुगेंच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभारकोल्हापूर फर्स्टच्या व्यासपीठावर सन्मान कर्तबगारांच्या कर्तृत्वाचा ! मुलाखतीतून उलगडली यशाची कहाणी ! !पी आर पाटील  म्हणजे  जिव्हाळा जपणारा माणूस : भरत रसाळेसर्किट बेंचकडून अवसायनातील दूध संस्था पात्र, मतदानाचा मार्ग मोकळाउपमहापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशदूरशिक्षण-ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास दहा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढस्वाभिमानीच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक, ठरली आंदोलनासह निवडणुकीची रणनिती  पंधरा ऑगस्टला प्रत्येक शाळेत असाक्षरमुक्त गाव शपथ अभियानलिंगायत समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक, मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापुरात आरसीसी क्लासेसची तोडफोड, शिवराज मोटेगावकरच्या विरोधात एनएसयुआय आक्रमक

जाहिरात

 

लिंगायत समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक, मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

schedule11 Aug 26 person by visibility 180 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लिंगायत समाजाच्या विविध मागण्या घेऊन मंगळवारी  ११ रोजी आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीने शिष्टमंडळानी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी लिंगायत समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळात सरसकटपणे लिंगायत समाजाला लाभ मिळावा अशी आग्रही मागणी केली. यावेळी, शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी ‘ लिंगायत समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारातक आहे. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळात सरसकटपणे सगळया लिंगायत समाजाला लाभ मिळण्यासंबंधी अध्यादेश काढू.’असे त्यांनी आश्वस्त केले.

इचलकरंजीतील नगरसेवक, संजय तेलनाडे, आलास जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य -प्रशांत शहापुरे, मनोजकुमार रणदिवे,  संतोष चिक्कोडे, राजशेखर तंबाके, ॲड सुरेश पाटील, शंकर बिराजदार, बसवराज कणकणवाडी, नितेश कोरी, अनिकेत चराटे ,मल्लिकार्जुन आरबोळे, बंडू पाटील कडोले, सागर बंडगर, संजय जाधव, अविनाश पाटील, संतोष पाटील, विजय पाटील, प्रा. संजय पाटील, राजू खमलेट्टी आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. लिंगायत समाजाने नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. विविध मागण्याकडे सरकारचे  लक्ष वेधण्यासाठी झालेल्या आंदोलनात  हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यादिनी मुख्यमंत्र्यांकडून, मंगळवारी मुंबईत बैठकीची ग्वाही दिली होतीं.

त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्यासोबत झालेल्या चर्चेत,विशेषतः महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना सुलभपणे लाभ मिळावा,महामंडळाच्या योजनांमधील जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, युवकांना शिक्षण व रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा या मागण्यांबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार करून येत्या अधिवेशनापूर्वी समस्त लिंगायत समाजाला सुधारित जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा आदेश काढण्यासाठी आश्वासन दिल्याची माहिती नगरसेवक तेलनाडे यांनी दिली.

 

 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes