Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लाचप्रकरण पडले महागात, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार निलंबितएकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर,  प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्टटीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षणचार्टर्ड अकाउंटंटस कोल्हापूर शाखेतर्फे दोन जुलैला उत्थान-  एमएसएमई महोत्सवएकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्यापुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलन

जाहिरात

 

चार्टर्ड अकाउंटंटस कोल्हापूर शाखेतर्फे दोन जुलैला उत्थान-  एमएसएमई महोत्सव

schedule24 Jun 26 person by visibility 151 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया ,कोल्हापूर शाखा,  एमएसएमई, स्टार्टअप कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन जुलै 2026 रोजी कोल्हापुरात 'उत्थान- एमएसएमई महोत्सव ' आयोजित केला आहे अशी माहिती चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सीए आशिष सेवेकरी यांनी दिली.
 हॉटेल  पॅवेलियन येथील मधुसूदन हॉल येथे हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात देशभरातील नामांकित सीए, तज्ञ वक्ते सहभागी होणार आहेत. कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सेवेकरी म्हणाले,  यंदाच्या महोत्सवची संकल्पना विविध घटकांना एकत्र आणून  सामुहिक विकास साधने हा आहे. हा महोत्सव त्याच विचाराचा एक भाग असून उद्योग, व्यवसायिक,  बँका आणि सरकार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध सरकारी योजना व संधी,  वित्तपुरवठा व गुंतवणूक, केंद्र व राज्य सरकारच्या अनुदान योजनेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे . तसेच उद्योग क्षेत्रातील नेटवर्किंगच्या संधी,  उद्योग वाढीसाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना यासंदर्भात परिसंवाद व सत्रे आयोजित केले आहेत. सीए चंदन लाहोटी हे ' एमएसएमई आयपीओ आणि उपलब्ध वित्तपुरवठा', धनेश राळे हे ' एम एस एम इ उद्योजकांना उद्भवणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय योजना' तर सीए यतिराज मर्दा हे 'केंद्रीय आणि राज्य सरकारच्या प्रोत्साहन योजना' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवातील सहभागासाठी नोंदणी आवश्यक आहे. पत्रकार परिषदेला कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष आलोक शहा,  सचिव राघवेंद्र बकरे, व्यवस्थापन समिती सदस्य नितीन हरगुडे , सीए निलेश भालकर, शाखा व्यवस्थापक स्वप्निल सादळे आदी उपस्थित होते. नोंदणीसाठी आयसीएआय कोल्हापूर शाखेने विशेष ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध केले आहे अधिक माहितीसाठी सीए भवन 80 10 75 0 597 व स्वप्नील साबळे 87 96 24 32 73 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes