माजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्या
schedule24 Jun 26 person by visibility 526 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील ज्येष्ठ विधीतज्ज्ञ व माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे यांचा नातू रौनक इंद्रजीत आडगुळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री हा प्रकार घडला. बुधवारी पहाटे, कुटुंबीयांच्या हा प्रकार निदर्शनास आला. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलविले. सीपीआरमधील डॉक्टरांनी, उपचारापूर्वीच रौनकचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथे नेण्यात आले आहे. सतरा वर्षाच्या रौनकच्या आत्महत्येने कुटुंब हादरले आहे. रौनकने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याच्या पश्वात आजोबा, आई -वडील, एक बहिण, चुलते असा परिवार आहे.