पशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रम
schedule24 Jun 26 person by visibility 30 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यात मान्सून 2026 वर एल निनो या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुधनाचे संरक्षण तसेच संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत चारा उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी उपलब्ध जमिनीवर जास्तीत जास्त हिरवा चारा लागवड करावी, चारा साठवणुकीवर भर द्यावा तसेच मुरघास निर्मितीचा अवलंब करावा. शेतकरी व पशुपालकांना सकस हिरवा चारा उपलब्ध व्हावा या हेतूने 100 टक्के अनुदानावर सुधारित वैरण बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेत वैरण बियाणे मागणी अर्ज लवकरात लवकर करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले.