Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लाचप्रकरण पडले महागात, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार निलंबितएकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर,  प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्टटीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षणचार्टर्ड अकाउंटंटस कोल्हापूर शाखेतर्फे दोन जुलैला उत्थान-  एमएसएमई महोत्सवएकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्यापुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलन

जाहिरात

 

टीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षण

schedule24 Jun 26 person by visibility 220 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी   कोल्हापूर   :    रविवारी २८ जून 2026 रोजी होणाऱ्या  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्रसंचालक, सहाय्यक परिरक्षक, झोनल अधिकारी यांचे प्रशिक्षण जिल्हा टीईटी परीक्षा समन्वयक आणि विस्तार अधिकारी डॉ.विश्वास सुतार, परीक्षा नियंत्रक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.मीना शेंडकर यांनी दिले . केंद्रसंचालक आणि सहाय्यक परिरक्षक यांना परीक्षेचे गांभीर्य, बारकावे समजावून सांगितले.  प्रशिक्षणस्थळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी  भेट देवून सूचना केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जस्मिन यांनी भेट देऊन संपूर्ण परीक्षा पद्धतीची माहिती घेऊन केंद्रसंचालक आणि सहाय्यक परिरक्षक यांना दक्ष राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले. ५४ केंद्रासाठी ५४ केंद्रसंचालक, १३ झोनल अधिकारी, ५४ सहाय्यक परिरक्षक, १२३ नियुक्त पर्यवेक्षक, ६६७ समवेक्षक, ९३ लिपिक, ९३ परिचर, एक जिल्हा परिरक्षक आणि केंद्र निहाय शिपाई अशी पर्यवेक्षकीय यंत्रणा सज्ज झाली. परीक्षा सुनियंत्रीत वातावरणात पार पडावी यासाठी तीन भरारी पथकांची नियुक्ती केली असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जस्मिन यांच्या आदेशानुसार प्रश्नपत्रिका  आणताना आणि नियोजित ठिकाणी नेताना जीपीएस प्रणाली कार्यान्वित होणार आहे . या परीक्षेसाठी १६८ दिव्यांग विद्यार्थी आहेत . सकाळी ८:३० वाजता फ्रिस्किंग होणार असून मेटल डिटेक्टर, फेस रिक्गनायझेशन याबरोबरच दुप्पटा, बुरखा, हिजाब, ओढणी, टोपी या गोष्टींना प्रतिबंध आहे. पेपर १ साठी सकाळी १०: १० नंतर आणि पेपर २ साठी दुपारी  २ वाजून १० मिनिटानंतर कुणालाही प्रवेश असणार नाही . पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या ओळखपत्रास वेगवेगळे रंग असून दोन सत्रात होणाऱ्या प्रश्नपत्रिकेसदेखील विषयनिहाय वेगवेगळे रंग आहेत.  सीसीटीव्ही संदर्भात अडचणींना समयोचित उत्तर दिले गेले .याप्रसंगी प्रशासन अधिकारी जयश्री जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राचार्य डॉ.रमेश होसकोटी, उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, हणमंत बिराजदार, आर . आर . चौगुले, संजीव बाबर, केंद्रसंचालक संजय सौंदलगे, प्रमिला साजणे, माधवी सौंदलगे, आर .पी . मोरे आदी  उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes