कोल्हापुरात रंगतोय आयपीएल फॅन पार्क
schedule24 May 26 person by visibility 183 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : टाटा आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अनुषंगाने कोल्हापुरात फॅन पार्कचे आयोजन केले आहे. येथील मेरी वेदर मैदान येथे 23 व 24 मे 2026 या कालावधीत महोत्सव रंगत आहे. या फॅन पार्क अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. अशी माहिती बीसीसीआयची प्रतिनिधी अलविन गायकवाड व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अभिजीत भोसले यांनी दिली. रविवारी 24 मे रोजी दुपारी तीन ते रात्री दहा कालावधीतील क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण येथे दाखवले जाणार आहे दुपारी साडेतीन वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स व सायंकाळी साडेसात वाजता दिल्ली कॅपिटल विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या सामन्यांचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. इथे प्रवेश विनामूल्य आहे. नागरिकांना या माध्यमातून प्रत्यक्ष स्टेडियम सारखा अनुभव घेता येईल अशी माहितीही त्यांनी दिली. फॅन पार्कमध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत तसेच विविध करमणुकीचे व मनोरंजनाचे गेम्स अनुभवता येतात. या फॅन पार्कचे आयोजन बीसीसीआयतर्फे करण्यात आले आहे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेने सहकार्य केले आहे.