Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
‘स्वमन सामाजिक’तर्फे कोल्हापुरात मानवाधिकारसंबंधी जनजागृतीप्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कारसतेज पाटलांचा प्रचाराचा धडाका, महायुतीचे नेते अडकले जागा वाटपाच्या चक्रात !!जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुष्काळी जत तालुक्यातील गावांची पाहणीअभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीरवन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मानएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा .विलास  नांदवडेकर  ग्रामीण भागांशी जोडलेलं, अनुभवी नेतृत्व ! रामचंद्र भोगमांची उमेदवारी दूध उत्पादकांना वाटतेय आपली !!मराठी अध्यापक संघातर्फे दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलनशेतकऱ्यांचा आवाज गोकुळमध्ये उमटणार, समविचारीतून बाबासाहेब देवकरांच्या उमेदवारीला उत्पादकांची पसंती

जाहिरात

 

मराठी अध्यापक संघातर्फे दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलन

schedule01 Oct 26 person by visibility 51 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :   अभिजात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे तीन व चार ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शिक्षक साहित्य संमेलन आयोजित केले आहे. राम गणेश गडकरी सभागृह येथे हे संमेलन होणार आहे.

शनिवारी, तीन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात होईल. सकाळी ११ वाजता संमेलनाचे उद्घाटन आहे. साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे हे उद्घाटन सोहळयाचे अध्यक्ष आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मराठी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव सुर्यकांत चव्हाण, प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती आहे. उद्घाटन सोहळयानंतर ‘मराठी भाषा : वर्तमान, आव्हाने आणि भविष्य’या विषयावर परिसंवाद आहे.

शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखालील या सत्रात मुंबई येथील डॉ. दीपक पवार व कुडाळ येथील प्रकाश परब हे मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी कथाकथन व त्यानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा’हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. रविवारी, चार ऑक्टोबर रोजी कवी संमेलन होणार आहे. त्यानंतर ‘गझल कट्टा’ कार्यक्रम आयोजित केला आहे. दुसऱ्या सत्रात ‘सुंदर माझी शाळा’ हा कवितांचा कार्यक्रम होणार आहे. संमेलनाचा समारोप दुपारी तीन वाजता होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes