ग्रामीण भागांशी जोडलेलं, अनुभवी नेतृत्व ! रामचंद्र भोगमांची उमेदवारी दूध उत्पादकांना वाटतेय आपली !!
schedule01 Oct 26 person by visibility 220 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ग्रामीण भाग, गावाकडची माणसं…शेतकरी आणि दूध उत्पादक या साऱ्या घटकांशी जोडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कळंबा येथील रामचंद्र भोगम. समाजकारण, राजकारण, सहकार, बांधकाम व्यावसायिक या क्षेत्रात आघाडीवर राहून, साऱ्यांना सोबत घेऊन काम करणारी व्यक्ती म्हणजे ते परिचित. यंदा, गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायतीकडून ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. गोकुळसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आलेल्या दूध उत्पादकांची संख्या पाहता त्यांच्यावरील विश्वासाची प्रचिती घडविणारा होता. दूध उत्पादकांनी भोगम यांची उमेदवारी ही आपली वाटते इतका जिव्हाळा त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे.
दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ते सर्वपरिचित होते. तीन दशकाहून अधिक काळ ते समाजकारणात सक्रिय आहेत. करवीर, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा मतदारसंघात दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांना मानणारा गट. या साऱ्यांसोबत त्यांचा स्नेह कायम आहे. बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी अनेकांचे घरकुल साकारण्याचे स्वप्न उतरविले आहे. कळंबा गावच्या विकासासाठी योगदान दिले आहे. शांत, संयमी आणि साऱ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. ग्रामीण भागात उत्तम नेटवर्क आहे. गावांशी नाळ कायम आहे. भोगमवाडीत त्यांनी विकास सेवा सोसायटी स्थापना केली. दूध संस्था स्थापन केल्या.
निरपेक्ष वृत्तीने काम करताना समाजातील अनेक घटकांना त्यांनी मदतीचा हात दिला. गरीब मुलांच्या शैक्षणिक सुविधेसाठी कळंबा भोगम कॉलनी येथे शाळा सुरू केली. या शाळेच्या माध्यमातून सामान्य कुटुंबांतील मुलांना शिक्षणाची संधी निर्माण करुन देता आली याचे मनस्वी समाधान असल्याचे ते सांगतात. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन नागरिकांनी भोगम कुटुंबींयांना नेहमीच साथ दिली आहे. त्यांचे पुत्र, सागर भोगम हे कळंबा गावचे पहिले लोकनियुक् सरपंच. सागर भोगम यांनी सरपंच म्हणून काम करताना विविध विकासकामे केली. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या. जिल्हा परिषद निवडणुकीत रामचंद्र भोगम यांच्या स्नुषा विनिता सागर भोगम यांना भाजपकडूनउमेदवारी मिळाली. पक्षाचे नेटवर्क, भोगम कुटुंबीयांनी जोडलेली माणसं या बळावर विनिता भोगम या विजयी झाल्या.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादकांच्या हक्काचा उमेदवार म्हणून रामचंद्र भोगम यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आग्रह झाला. भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना जमलेले दूध उत्पादक पाहून ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार ठरत आहेत. शेतकरी व दूध उत्पादकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ आहे. ग्रामीण भागातील अनुभवी नेतृत्व गोकुळ सारख्या संस्थेत दूध उत्पादकांचा प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीत्व करायला हवे हा आवाज वाढत आहे.