Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
‘स्वमन सामाजिक’तर्फे कोल्हापुरात मानवाधिकारसंबंधी जनजागृतीप्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कारसतेज पाटलांचा प्रचाराचा धडाका, महायुतीचे नेते अडकले जागा वाटपाच्या चक्रात !!जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुष्काळी जत तालुक्यातील गावांची पाहणीअभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीरवन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मानएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा .विलास  नांदवडेकर  ग्रामीण भागांशी जोडलेलं, अनुभवी नेतृत्व ! रामचंद्र भोगमांची उमेदवारी दूध उत्पादकांना वाटतेय आपली !!मराठी अध्यापक संघातर्फे दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलनशेतकऱ्यांचा आवाज गोकुळमध्ये उमटणार, समविचारीतून बाबासाहेब देवकरांच्या उमेदवारीला उत्पादकांची पसंती

जाहिरात

 

सतेज पाटलांचा प्रचाराचा धडाका, महायुतीचे नेते अडकले जागा वाटपाच्या चक्रात !!

schedule01 Oct 26 person by visibility 49 categoryउद्योग

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : जिल्हयाचे प्रमुख सत्ता आणि आथिक केंद्र असलेल्या गोकुळवर वर्चस्व ठेवण्यासाठी राजकीय घडामोडी वेगावल्या आहेत. गोकुळसाठी महायुती विरुद्ध काँग्रेस प्रणित समविचारी आघाडी अशी लढत रंगणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी इच्छुक उमेदवारांना सोबत घेऊन प्रचाराचा धडाका लावला आहे. तर महायुतीचे नेते मंडळी अजून जागा वाटपाच्या चक्रात अडकले आहेत. ‘आम्ही सगळे जुळेभाऊ’असे नेते मंडळी म्हणत असले तरी महायुतीमधील घटक पक्षात मात्र जागा वाटपावरुन एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे. दरम्यान महायुतीकडून इच्छुक उमेदवार तालुकानिहाय दौरा करत आहेत.

गोकुळच्या २५ जागेसाठी निवडणूक होत आहे. मागील एक वर्षाचा अपवाद वगळता गोकुळमध्ये भाजप वगळून सारे पक्ष सत्तेत होते. आता मात्र काँग्रेस प्रणित समविचारी आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी समविचारी आघाडी करत गोकुळच्या निवडणुकीसाठी जिल्हा पिंजून काढत आहेत. रोज एका तालुक्याचाा दौरा करत आहेत. गोकुळमध्ये सत्ता असताना राबविलेल्या योजना लोकांसमोर मांडत आहेत. महायुतीतील  विसंगती दूध उत्पादकांच्या समोर आणत आहेत. समविचारी आघाडीच्या इच्छुक उमेदवार त्यांच्या सोबतीला आहेत.  

महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण हा विषय प्रतिष्ठेचा ठरला आहे. पक्षीय ताकतीवर नको तर ठरावधारकांच्या संख्याबळावर निवडणूक लढली पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि जनसुराज्य ठाम दिसतात. यामुळे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्यमध्ये एकमत घडत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे बैठक होऊनही चर्चा निष्फळ ठरली. राष्ट्रवादी दहा जागा, भाजप आणि शिवसेना प्रत्येकी आठ तर जनसुराज्यला तीन जागा हव्या आहेत. नेतेमंडळीत कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. जागा वाटपाचा फॉर्म्युला न ठरल्यामुळे महायुतीच्या नेतेमंडळीच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभही झाला नाही. प्रचाराच्या शुभारंभाची तारीख जाहीर करुन नंतर पुढे ढकलण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes