Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षकांचा प्रशिक्षणामधील अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करावा : भरत रसाळेगोकुळच्या राजकारणात महादेवराव महाडिकांची एंन्ट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू ! सत्ताधारी नेतृत्वावर डागली तोफ !गोकुळचे  चेअरमन-संचालकांनी घेतली अजित पवारांची भेट, दुग्ध व्यवसायसंबंधी चर्चा !!जेईई अॅडव्हान्स परीक्षेत विवेकानंद  कॉलेजचे यश महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात, ८१ प्रभागात नागरिकांसाटी शिबिरेभालकर्स कला अकादमीचे पुरस्कार जाहीर ! अनिल वेल्हाळ, सतीश रणदिवे, दिलीप बापट, प्रवीण कोडोलीकरांचा समावेश !!केआयटीतर्फे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंबंधी रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमवडगावमध्ये उभारणार १०० खाटांचे हॉस्पिटल ! खासदार-आमदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक !! शिक्षक त्रस्त, दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन ! प्रशिक्षण नावापुरतेच, प्रशिक्षणाची वेळही गैरसोयीची !!देशभरातील टॉप टेन संशोधकात शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रमोद पाटील !

जाहिरात

 

 रंगबहारतर्फे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन 

schedule03 Jun 25 person by visibility 123 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :   कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या जयंती निमित्त कोल्हापुरातील रंगबहार संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी  पद्माराजे उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.  याप्रसंगी रंगबहार चे सचिव संजीव संकपाळ, श्रीकांत डिग्रजकर, प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे, सुधीर पेटकर, कला दिग्दर्शक सतीश बिडकर, बबन माने, राहुल रेपे, प्रा अभिजित कांबळे, सुदर्शन वंडकर, विजय उपाध्ये, सुभाष वाणी, पुष्कराज मेस्त्री उपस्थित होते. याप्रसंगी  कलामहर्षींच्या आठवणींचा जागर करण्यात आला. चित्रपटसृष्टीतील पहिलेवहिले तंत्रज्ञान बाबूराव पेंटर यांनीच रूढ केले आहे. यामध्ये भारतीय कॅमेर्‍याने चित्रित केलेला पहिला चित्रपट सैरंध्री असो, याच चित्रपटासाठी स्त्री कलाकाराकडून स्त्री पात्राची भूमिका असो, चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू करण्याचा प्रभातच्या आधी महाराष्ट्र फिल्म कंपनीचा मान असो, निर्मिती, वेशभूषा, ट्रिकसीन असो, की प्रसिद्धीसाठी पोस्टरचा वापर असो, ही सारी तंत्रे पेंटरांनी पहिल्यांदाच चित्रपटासृष्टीत रूढ केली चित्रकार,शिल्पकार ,तंत्रज्ञ,चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक अश्या बहुआयामी कार्यामुळेच कलामहर्षी म्हणून ते गौरविले जात. प्रतिमा चित्रणातील कौशल्य व रंगभूमीवरील नेपथ्य. विशेषत: पडद्याची कलात्मकता या बाबतींत त्यांनी खूपच लौकिक मिळविला होता. बाबूराव पेंटर यांच्या चित्रकारितेने रसिकांना भुरळ घातली होती.    त्यांचे कलाकर्तृत्व उदंड मानावे लागेल असे जाणकारांनी नमूद केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes