कोल्हापुरात आदिवासी दिन उत्साहात, विविध उपक्रमांचे आयोजन
schedule10 Aug 25 person by visibility 99 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, शाखा कोल्हापूरतर्फे रविवारी (१० ऑगस्ट २०२५) आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी राजेंद्र गाडेकर ,शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ ,नायब तहसीलदार शिवाजी गवळी करवीर,नायब तहसीलदार पन्हाळा संजय वळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मशाल प्रज्वलित करून करण्यात आली. जिल्हा परिषद सोसायटी सभागृहात हा कार्यक्रम झाला.
प्रमुख वक्ते केएमसी कॉलेजचे प्रा.सचिन धुर्वे ,शिवाजी विद्यापीठ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी प्रा. मुकेश पाडवी यांनी मार्गदर्शन केले. धुर्वे म्हणाले ‘आदिवासी समाजाचा विकास व्हायचा असेल तर आदिवासी तरुणांनी राजकीय क्षेत्रात जाणे आवश्यक आहे. नॅनो सायन्स या तंत्रज्ञानामध्ये अतिशय रोजगाराच्या संधी असून तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन त्यामध्ये संशोधन करावे असे मत प्रा.मुकेश पाडवी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष धादवड यांनी शासनाच्या आदिवासींसाठी असलेल्या योजना पोहोचविण्यासाठी संघटना प्रयत्न करत असून याही पुढे संघटनेचे काम असेच चालू राहिल.
या कार्यक्रमासाठी निंबा भांगरे, शिवाजी मरभळ, मंगल भिसे ,पुणे विभागीय अध्यक्ष किरण ठोंगिरे, प्रभाकर भोये ,हनुमंत खोटरे ,ढवळा गवारी ,जनार्दन सुरकुले ,सोमनाथ कवठे, जनार्दन भोईर ,कुंडलिक दाते, भगवंत शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन होईल अशा प्रकारचे नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी ऑल इंडिया आदिवासी एप्लाॅईज फेडरेशन संघटनेचे उपाध्यक्ष नितीन गभाले , वृषाली लोहकरे, खजिनदार सुभाष तारडे उपस्थित होते. नितीन गभाले, रुपेश नाडेकर यांनी सूत्रसंचालन केले तानाजी बुळे यांनी आभार मानले.