Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीवर, सीईओंचे गटविकास अधिकाऱ्यांना पत्र मंत्री - कुलगुरू - अधिकाऱ्यांच्या नावाने वृक्ष लागवड ! शिक्षण सहसंचालक कार्यालयाचा उपक्रम!!सतेज पाटलांनी आणलेल्या टोलचे भूत महायुती सरकारने गाडले, ते काय आमची हत्तीवरुन मिरवणूक काढणार ? आमदार राजेश क्षीरसागर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची पदोन्नती सेवा ज्येष्ठतेने व्हावी, शिक्षक संघटना बैठकीत मागणीसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये १७ तासांची ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीशिक्षक संघ थोरात गटाची गुरुवारी राळेगणसिद्धीत महामंडळ सभाजीएसटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापुरात येणारमुख्यमंत्र्यांचा शक्तिपीठ महामार्गचा सिनेमा कोल्हापूरसह तेरा जिल्ह्यात फ्लॉप होणार - सतेज पाटील सरकारी कंत्राटदारांचे रविवारी कोल्हापुरात महाअधिवेशन ! थकित बिलाचा विषय ऐरणीवर, फेडरेशनची स्थापना होणार !!शक्तिपीठ  महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार !  एकच निर्धार , शक्तिपीठ हद्दपार !!

जाहिरात

 

मंत्री - कुलगुरू - अधिकाऱ्यांच्या नावाने वृक्ष लागवड ! शिक्षण सहसंचालक कार्यालयाचा उपक्रम!!

schedule11 Jun 26 person by visibility 103 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री  चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या परिसरात २५१ रोपांची लागवड करण्यात आली. मंत्री पाटील यांच्या 67 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 67 प्रजातीची रोपे लावण्यात आली कुलगुरू डॉक्टर आर के कामत यांच्या हस्ते हा उपक्रम झाला. विशेष  म्हणजे, मंत्री पाटील यांच्या  नावाने वडाचे झाड लावण्यात आले. त्याचे नामकरण छत्र-छाया वृक्ष असे करण्यात आले. कुलगुरु यांचे नावे वृक्ष लावण्यात आले, त्यास कुलगुरु वृक्ष असे नामकरण करण्यात आले

 विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण कार्यालय, कोल्हापूर येथे विशेष हरित उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या  सुरुवातीला विभागीय सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. मंत्री पाटील यांच्या ६७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६७ प्रजार्तीची निवड करण्यामागचा उद्देश आणि २५१ वृक्षलागवडीचे सविस्तर नियोजन यावर प्रकाश टाकला. या कार्यालयाच्यावतीने २५१ वृक्षांचे केवळ रोपण न करता, त्यांचे उत्तम संवर्धन व संगोपन करण्याचा संकल्प  करण्यात आला. कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी मंत्री पाटील यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या महान शिक्षण कार्याचा गौरव केला.

 वृक्षलागवड मोहिमेमध्ये विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना  आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी  मोठे साहाय्य केले. यामध्ये राजाराम कॉलेज, कोल्हापूर, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर, न्यू कॉलेज, कोल्हापूर, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर, धंनजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा, भोागवती कॉलेज, कुरुकली येथील एनएसएस स्वयंसेवक व एनसीसी कॅडेट्सनी प्रत्यक्ष खड्डे खोदण्यापासून ते वृक्षारोपण व त्यांना पाणी घालण्यापर्यंतच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवला. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथील प्राचार्य डॉ. आंधळे यांनी आभार मानले.

<

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes