Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघ थोरात गटाची गुरुवारी राळेगणसिद्धीत महामंडळ सभाजीएसटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापुरात येणारमुख्यमंत्र्यांचा शक्तिपीठ महामार्गचा सिनेमा कोल्हापूरसह तेरा जिल्ह्यात फ्लॉप होणार - सतेज पाटील सरकारी कंत्राटदारांचे रविवारी कोल्हापुरात महाअधिवेशन ! थकित बिलाचा विषय ऐरणीवर, फेडरेशनची स्थापना होणार !!शक्तिपीठ  महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार !  एकच निर्धार , शक्तिपीठ हद्दपार !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखेंची  जयंती साजरीहलाल प्रमाणपत्र रद्द करत नाहीत तोपर्यंत लढा चालू - रमेश शिंदेविद्यापीठ विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली कुलगुरुंची भेट रवळनाथ हौसिंग फायनान्सच्या, कोल्हापूर शाखेच्या वर्धापनदिनी रंगला आनंद सोहळानाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली प्रशासकीय मंडळची भेट

जाहिरात

 

मुख्यमंत्र्यांचा शक्तिपीठ महामार्गचा सिनेमा कोल्हापूरसह तेरा जिल्ह्यात फ्लॉप होणार - सतेज पाटील

schedule09 Jun 26 person by visibility 318 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाची स्क्रिप्ट नागपुरात लिहिली असली तरी कोल्हापूरसह तेरा जिल्ह्यात त्यांचा हा सिनेमा चालणार नाही. शक्तीपीठ महामार्गाचा शो फ्लॉप होणार " असा सज्जड दम विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी भरला. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी कोल्हापुरात दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले याप्रसंगी ते बोलत होते.  आमदार सतेज पाटील, " आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा ही आमची भूमिका आहे. गेली दोन - सव्वा दोन वर्षे आंदोलनाची धार वाढत आहे. शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही हे लोकांनाही पटले आहे. सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा हा महामार्ग नको आहे. यामुळे शेतकरी सातत्याने रस्त्यावर उतरुन संघर्ष करत आहेत. हे आंदोलन सर्वपक्षीय आहे. जिल्ह्यातील अकरा नद्यावरून हा महामार्ग जाणार आहे. यामुळे महापुराचा धोका आजूबाजूच्या गावांना भेडसावणार आहे. या मार्गावरील जमिनी, मंदिरे बाधित होणार आहेत. हिंदुत्वाच्या घोषणा देणारे भाजपवाले आता कुठे आहेत ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. सरकारने  लोकसभा निवडणुकीच्या काळात शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याची घोषणा केली होती व पुन्हा आदेश कसा काय निघू शकतो ? शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात पुरुषांनी काठी तर महिलांनी लाटणे घेऊन  लढायला तयार राहावे "
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाचा स्क्रिप्ट नागपुरात लिहिले असले तरी कोल्हापूरसह तेरि जिल्ह्यात हा सिनेमा चालणार नाही.  शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी करायला सुरुवात केली तर विरोध होणार. भविष्यकाळासाठी निकराची लढाई करावी लागेल. शेतकऱ्यांना ताकद देणे ही आमची भूमिका आहे. आमच्या  संयमाचा अंत पाहू नका" असा इशारा पाटील यांनी दिला. सभा संपल्यानंतर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेते मंडळींनी जिल्हाधिकारी विजय राठोड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes