Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कारलिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!

जाहिरात

 

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये १७ तासांची ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

schedule10 Jun 26 person by visibility 311 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कणेरी येथील न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख व वैद्यकीय संचालक, जागतिक ख्यातीचे मेंदू शल्यविशारद डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या नेतृत्वाखाली जगातील पहिली मानली जाणारी १७ तासांची ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून जागतिक वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक यशामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील एका धर्मादाय रुग्णालयाने जागतिक वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना महानगरांप्रमाणेच जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, या दूरदृष्टीतून सिद्धगिरी मठाचे अध्यक्ष परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरणेने सिद्धगिरी हॉस्पिटलची उभारणी झाली. आज त्याच संकल्पनेचे मूर्त स्वरूप म्हणून सिद्धगिरीने आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. रुग्णसेवा, संशोधन आणि अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान यांचा संगम घडवत संस्थेने आरोग्यसेवेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

वैद्यकीय साहित्य आणि जागतिक संशोधनामध्ये अशा प्रकारच्या रुग्णाची नोंद यापूर्वी कधीही झालेली नसल्याने ही केस अत्यंत दुर्मिळ आणि अभूतपूर्व मानली जात आहे. या परिस्थितीत शस्त्रक्रियेतील अगदी छोटी चूकसुद्धा रुग्णासाठी जीवघेणी ठरू शकत होती. मेंदूच्या महत्त्वाच्या भागांचा रक्तपुरवठा कायम राखत आजारी रक्तवाहिनीचे सुरक्षित व्यवस्थापन करणे हे अत्यंत मोठे आव्हान होते.

जागतिक ख्यातीचे मेंदू शल्यविशारद डॉ. मरजक्के यांनी यापूर्वी १०० हून अधिक ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. या समृद्ध अनुभवाच्या बळावरच वैद्यकीय साहित्यात यापूर्वी नोंद नसलेल्या या अतिदुर्मिळ आणि जटिल रुग्णावर यशस्वी उपचार करणे शक्य झाले.  या कार्यशाळेत देशभरातील  नामवंत न्यूरोसर्जन्स, मायक्रोव्हॅस्क्युलर तज्ज्ञ आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी होणार असून ब्रेन बायपास सर्जरी, मायक्रोव्हॅस्क्युलर अॅनास्टोमोसिस, रिव्हॅस्क्युलरायझेशन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक न्यूरोसर्जिकल कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 ही शस्त्रक्रिया  करुन डॉ. मरजक्के यांनी  राष्ट्रीय स्तरावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. या कामगिरिची दखल घेउन न्यूरोजिकल सोसाइटी ऑफ़ इंडिया या न्यूरोसर्जररिच्या शिखर संस्थाने ब्रेन बायपास कार्यशाळेसाठी या सिद्धगिरि हॉस्पिटल सारख्या ग्रामीण रुग्णालयाची निवड़ केली आहे .या कार्यशालेसाठी देश-विदेशातील न्यूरोसर्जन येथे येत आहेत. हा ‘केअर बियॉन्ड क्युअर’ आणि ‘वर्क इज वर्शिप- काम ही कैलास ’ याचा पुरावा आहे.

सध्या रुग्णाची प्रकृती उत्तम असून तो समाधानकारकरीत्या बरा होत आहे. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेचा शास्त्रीय अहवाल आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू असून भविष्यात ही केस जगभरातील न्यूरोसर्जन्ससाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या यशाबद्दल श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी जागतिक ख्यातीचे मेंदू शल्यविशारद डॉ. मरजक्के, न्यूरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, डॉ. अंकुश पराते (सहाय्यक न्यूरोसर्जन), ऑपरेशन थिएटर नर्सिंग स्टाफ, तंत्रज्ञ आणि सर्व सहकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.  पत्रकार परिषदेला डॉ.प्रकाश भरमगौडर, डॉ प्रतिमा मरजक्के उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes