Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशमहापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाहीकोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !गोकुळमधील बोगस सभासदांना दिलासा नाही-प्रकाश बेलवाडेंची माहिती

जाहिरात

 

परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी

schedule12 Mar 26 person by visibility 62 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : कोल्हापूर महापालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर नगरसेवक  सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत परिवहन विभागाचा सविस्तर आढावा घेतला. परिवहन विभागाला उर्जितावस्था देत केएमटीला स्वयंपूर्ण व नफ्यात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सभापतीपदी निवड झाल्यानंतर जाधव यांनी गुरुवारी परिवहन कार्यालयास भेट देत विभागातील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, ट्रॅफिक अधिकारी नितीन पोवार, लेखा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी, खरेदी अधिकारी संजय जाधव, आस्थापन व्यवस्थापक बानू साबळे, वर्कशॉप इन्चार्ज आर. आर. मोरे, प्रदीप मेहत्तर, दिनेश सोमण, संतोष लोखंडे आदी अधिकाऱ्यांशी   चर्चा केली.
यावेळी सत्यजित जाधव म्हणाले, केंद्र व राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या १०० एसी बसांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असून केएमटीचा ताफा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बसांनी सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बससेवा वापरावी यासाठी बसस्थानके स्वच्छ ठेवणे, सेवा दर्जेदार करणे आणि केएमटीचा कारभार सक्षम करणे यावर भर देण्यात येणार आहे.
हातकणंगले तसेच इचलकरंजी परिसरात केएमटी बससेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असून, केएमटी विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी अधिकाऱ्यांसोबत नियमित आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सत्यजित जाधव यांनी सांगितले.

यानंतर नूतन सभापती जाधव यांनी शास्त्रीनगर येथील केएमटी वर्कशॉपला भेट देऊन स्टोअर, ऑइल, असेंबली, डिझेल विभागासह विविध विभागांची पाहणी केली. वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. या वेळी वर्कशॉपचे सुपरवायझर जगदीश शेंडगे, मोरे तसेच केएमटी मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्या हस्ते जाधव यांचा सत्कार करण्यात आला. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes