Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशमहापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाहीकोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !गोकुळमधील बोगस सभासदांना दिलासा नाही-प्रकाश बेलवाडेंची माहिती

जाहिरात

 

हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा-

schedule12 Mar 26 person by visibility 40 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करावी अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली.  प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे कोल्हापूर- तिरुपतीच्या हरिप्रिया एक्स्प्रेस मधील सीट्स किंवा डबे वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. परंतु, ऑक्टोबर २०२५ पासून रेल्वे प्रशासनाने हरिप्रिया एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत आणि प्रकारात बदल केले आहेत. सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या ३ स्लीपर डब्यांची कपात केल्यामुळे सामान्य प्रवाशांचे सुमारे २२५ बर्थ कमी झाले आहेत. यामुळे प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत असून, याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून कोल्हापूर - तिरुपती (हरिप्रिया एक्स्प्रेस - ट्रेन क्र. १७४१६/१७४१५) मधील कपात केलेल्या ३ स्लीपर कोच डब्यांची संख्या पूर्ववत करून बर्थची संख्या वाढवावी आणि आगाऊ आरक्षण कालावधीतील १८० सीट्स बुकिंगची संख्या पूर्ववत करण्या बाबतबाबत आपल्या स्तरावरून संबधितांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी असे मागणी क्षीरसागर यांनी केले आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes