एलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन
schedule12 Mar 26 person by visibility 23 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : एलआयसीमधून प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेले नंदकुमार शंकरराव जाधव (वय ८७ रा. गणेश को-ऑपरेटिव्ह सोसायटी कावळा नाका ) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, बहिण, भाऊ, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या शनिवारी पंचगंगा स्मशानभूमीत आहे.एलआयसीमधील लोकप्रिय व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. एलआयसीतील कर्मचाऱ्यांची पहिली गृहनिर्माण संस्था त्यांनी स्थापन केली. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून तीस वर्षापेक्षा जास्त काम सांभाळले. स्थायी समिती माजी सभापती गौतम जाधव यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. कोल्हापुरातील खर्डेकर व बावडेकर या घराण्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.