Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशमहापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाहीकोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !गोकुळमधील बोगस सभासदांना दिलासा नाही-प्रकाश बेलवाडेंची माहिती

जाहिरात

 

डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यश

schedule12 Mar 26 person by visibility 28 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  :कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागाचे माजी विद्यार्थी अथर्व संतोष पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत देशात ३२ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले.  भारतीय नौदलात सब लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाली आहे.

संतोष हे २०२४ बॅचचे विद्यार्थी आहेत.  अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण मानल्या जाणाऱ्या यूपीएससी सीडीएस परीक्षेत मिळवलेले हे यश महाविद्यालयासाठी  अभिमानास्पद आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच त्यांनी शिस्तबद्ध तयारी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील,  पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए. के . गुप्ता , प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे तसेच एआयएमएल विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी अथर्व पाटील यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes