Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली, डॉ. मैनाक घोष नवे जिल्हाधिकारी32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणारलोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्रकोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणेइंधनाचा साठा मुबलक प्रमाणात - आमदार राजेश क्षीरसागरडॉ. संजय डी. पाटील, भरत लाटकर यांना पुरस्कार , शनिवारी विद्यापीठात वितरण समारंभ सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद, शोधनिबंध - पोस्टर सादरीकरणअन्न - औषध प्रशासन विभागातर्फे गांधीनगरमध्ये फूड सेफ्टी प्रशिक्षणशिवसेना गटनेते शारगंधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेशमहिला शेतीकामात होत्या तोपर्यंत आजारांच्या समस्या कमी होत्या

जाहिरात

 

गोकुळमार्फत सेवाभावी उपक्रमांनी मंत्री मुश्रीफांचा वाढदिवस साजरा 

schedule26 Mar 26 person by visibility 58 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री  हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ परिवाराच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, चेअरमन नविद मुश्रीफ व संचालकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाले. या वाढदिवसाच्या निमित्ताने गोकुळ परिवाराच्यावतीने ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालय येथील प्रागणांमध्ये औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले. वाढदिवस सेवाभावी उपक्रम

 

ज्येष्ठ संचालक विश्वास  पाटील म्हणाले, ‘मंत्री मुश्रीफ यांचा कार्यकाळ खऱ्या अर्थांनी विकास पर्व ठरला आहे. समाजातील वृद्ध, अपंग, निराधार व रुग्ण घटकांसाठी त्यांनी सातत्याने संवेदनशीलतेने काम केले. समाजातील प्रत्येक घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले केले. याप्रसंगी संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, बालकल्याण संकुलच्या मानद कार्यवाह श्रीमती पद्मजा तिवले, पी.के.डवरी, सचिन माने, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. पी.जे.साळुंके, सहा. व्यवस्थापक संकलन दत्तात्रय वागरे, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, डॉ.एम.पी.पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.

दरम्यान मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथील रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी यांना मोफत फळे तसेच सुगंधी दूध वाटप करण्यात आले. जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना, कोल्हापूर (बालकल्याण संकुल) येथे मुलांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वितरण केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes