त्या शिक्षकांना टीईटीतून सवलत मिळावी - भरत रसाळे
schedule18 Jun 26 person by visibility 193 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिक्षण हक्क कायदा २००९’ लागू होण्यापूर्वी सेवेत असलेले शिक्षक हे तत्कालिक परीक्षा देऊन व सेवाशर्ती नियमावलीतील तरतुदी पूर्ण करून सेवेत कायम झाले आहेत . या शिक्षकांच्या सेवा २५ व वर्षापेक्षाही जास्त झालेल्या आहेत .अशा शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सवलत द्यावी. त्यांच्यावर टीईटी न लादता सेवांतर्गत रिफ्रेशमेंट कोर्सद्वारे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना दिले. तसेच पंतप्रधान व केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यालयाही निवेदन मेल केले. शिष्टमंडळामध्ये समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे , शिक्षक सेनेचे समन्वयक संतोष आयरे , विभागीय अध्यक्ष महादेव डावरे , पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन अमित परिट , संचालक शिवाजी सोनाळकर, सर्जेराव नाईक , कृष्णात कुंभार व शिवतेज नाईक यांचा सहभाग होता.