शिवसेनेचा साठावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा
schedule19 Jun 26 person by visibility 53 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवसेना पक्षाचा 60 वा वर्धापन दिन, कोल्हापूर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी साडेनऊच्या 9-30 वाजता करवीर निवासिनी अंबाबाई देवीची महाआरती करण्यात आली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली. मिरजकर तिकटी येथे वर्धापन दिनानिमित्त भगव्याचे ध्वजारोहण व साखर पेढे वाटप केले. सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने यांनी मनोगते व्यक्त केली. नगरसेवक सुनील मोदी यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, तालुका प्रमुख विराज पाटील, राजू यादव,पोपट दांगट,विनोद खोत,राजेंद्र जाधव, स्मिता सावंत, स्वरूप मांगले,युवतीसेनेच्या कृष्णा जाधव, अनिता ठोंबरे, सानिका दामूगडे,सुमित मेळवंकी, दीपक गौड,चैतन्य देशपांडे,अक्षय घाटगे,भरत आमटे, शौनक भिडे,दिनेश परमार, ऋषि जोशी,दिनेश साळोखे, रुपेश रोडे, अरुण अबदागिरी, चंदू भोसले,युवराज खंडागळे,अभिजित बुकशेट, सिद्धी दामूगडे,संकेत गुरुव, जयवंत वडगावंकर, किरण हांडे आधी उपस्थित होते