Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटपशिवसेनेचा साठावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरागायक पंडित विनोद डिग्रजकरांनी अमेरिकत उलगडला बंदिशींचा खजानाटीईटी परीक्षेसाठी राज्यभरात सहा लाखावर परीक्षार्थी, १८ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉचगांधीनगर परिसरातील बांधकामाबाबत भाजप - शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, सुनील मोदींनी तो व्हिडिओ दाखवावाशिवाजी विद्यापीठातर्फे ४१० विद्यार्थ्यांना २९ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती प्रदानशिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवारब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे श्री राम कथाचे आयोजनत्या शिक्षकांना टीईटीतून सवलत मिळावी - भरत रसाळे

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठातर्फे ४१० विद्यार्थ्यांना २९ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती प्रदान

schedule18 Jun 26 person by visibility 141 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ४१० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना २९ लाख ५५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामधील सर्वाधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या अधिविभागांचे प्रमुख आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते आज करण्यात आला. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यावेळी प्रमुख उपस्थित होत्या.

पदव्युत्तर प्रवेश विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या योजनेसाठी यंदा १,१३८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी विविध घटकांतील पात्र विद्यार्थ्यांची निवड करून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. योजनेसाठी ४१० विद्यार्थी पात्र ठरले. यात विद्यार्थिनींची संख्या ३५६ इतकी आहे. यावेळी कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते या महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा प्रशस्तीपत्र, शाल व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये डॉ. एस. एस. कदम, डॉ. एस.एच. सावंत, डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. एस.एल. कदम, डॉ. एस.एम. पाटील, डॉ. राजाराम पाटील, डॉ. आर.जी. कुलकर्णी, डॉ. डी.एम. पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. अजय साळी यांच्यासह महाविद्यालयांचे शिक्षक व अधिकारी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले. उपकुलसचिव तेजस्विनी भूतकर यांनी आभार मानले.

सर्वाधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविणारी महाविद्यालये

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा: शहरी गट : तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (११), निमशहरी गट : शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड डी.एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंग्लज (१३), अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी, आष्टा (१३), ग्रामीण गट : संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, महागाव (ता. गडहिंग्लज) (१२). वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा: शहरी गट : द न्यू कॉलेज, कोल्हापूर (९), निमशहरी गट : डी. आर. माने महाविद्यालय, कागल (११), ग्रामीण गट : भोगावती महाविद्यालय, कुरूकली (५).  मानवविज्ञान विद्याशाखा: शहरी गट :  न्यू कॉलेज, कोल्हापूर (१०), निमशहरी गट : डी. आर. माने महाविद्यालय, कागल (८), ग्रामीण गट : पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी आर्ट्स कॉलेज, झरे (१०). आंतरविद्याशाखीय विद्याशाखा: शहरी गट : कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्स फॉर विमेन, कोल्हापूर (६), निमशहरी गट : संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव (९).

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes