Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटपशिवसेनेचा साठावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरागायक पंडित विनोद डिग्रजकरांनी अमेरिकत उलगडला बंदिशींचा खजानाटीईटी परीक्षेसाठी राज्यभरात सहा लाखावर परीक्षार्थी, १८ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉचगांधीनगर परिसरातील बांधकामाबाबत भाजप - शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, सुनील मोदींनी तो व्हिडिओ दाखवावाशिवाजी विद्यापीठातर्फे ४१० विद्यार्थ्यांना २९ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती प्रदानशिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवारब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे श्री राम कथाचे आयोजनत्या शिक्षकांना टीईटीतून सवलत मिळावी - भरत रसाळे

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवार

schedule18 Jun 26 person by visibility 211 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते डॉ. पवार यांना गुरुवारी, (१८ जून २०२६ ) नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि केंद्राचे माजी मानद संचालक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या त्या कन्या आहेत.

दिवंगत इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कार्य आणि इतिहास यांचा सखोल अभ्यास व संशोधन केले. त्या कार्याचा वारसा रक्तातच असल्याने डॉ. मंजुश्री पवार या पदाला निश्चितपणे न्याय देतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. कामत यांनी या प्रसंगी व्यक्त केला. डॉ. पवार यांचा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीचे संशोधन, इतिहास आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेन, अशी ग्वाही देताना डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, राजर्षी शाहू संशोधन केंद्राशी डॉ. पवार यांचे भावनिक नाते होते. त्यांनी आयुष्यभर जपलेले संशोधन, इतिहासाची चिकित्सा आणि शाहू विचारांचा प्रसार यांचा वारसा पुढे नेण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी भावनिक, सन्मानाचा आणि तितकाच जबाबदारीचा क्षण आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत केंद्राच्या कार्याला अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. अरुंधती पवार, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes