Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटपशिवसेनेचा साठावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरागायक पंडित विनोद डिग्रजकरांनी अमेरिकत उलगडला बंदिशींचा खजानाटीईटी परीक्षेसाठी राज्यभरात सहा लाखावर परीक्षार्थी, १८ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉचगांधीनगर परिसरातील बांधकामाबाबत भाजप - शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, सुनील मोदींनी तो व्हिडिओ दाखवावाशिवाजी विद्यापीठातर्फे ४१० विद्यार्थ्यांना २९ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती प्रदानशिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवारब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे श्री राम कथाचे आयोजनत्या शिक्षकांना टीईटीतून सवलत मिळावी - भरत रसाळे

जाहिरात

 

गांधीनगर परिसरातील बांधकामाबाबत भाजप - शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, सुनील मोदींनी तो व्हिडिओ दाखवावा

schedule18 Jun 26 person by visibility 103 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : तावडे हॉटेल –गांधीनगर परिसरातील बेकायेदशीर बांधकामावरील कारवाईबाबत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीने पत्रकार परिषदेत केली. तसेच महापालिका सभागृहात स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांनी ‘गांधीनगर प्रकरणामध्ये कोण, कोणाला भेटून काय बोलले, याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे’ असे म्हटले आहे. नगरसेवक मोदी यांनी तो व्हिडिओ जनहित व महापालिका हित डोळयासमोर ठेवून जाहिरपणे दाखवण्याचे धाडस करावे.’अशी मागणी कृती समितीने केली.

कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा इंदूलकर,दिलीप देसाई, माजी नगरसेवक अनिल कदम, अशोक भंडारे, रमेश पुरेकर, किशोर घाटगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बाबा इंदूलकर यांनी, ‘महापालिका सभागृहात नगरसेवक मोदी यांनी जे विधान केले आहे, त्या संदर्भातील व्हिडिओ त्यांनी जनतेसमोर दाखवावा. जेणेकरुन लोकांच्या समोर सत्य परिस्थिती येईल. त्यांनी जर तो व्हिडिओ दाखविला नाही तर स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची ज्या नेत्यांनी निवड केली  त्यांनी यासंबंधी मोदी यांना जाब विचारावा. आणि व्हिडिओ दाखविण्यास सांगावे.’

भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामांच्यावरील कारवाईस स्थगिती मिळावी असे पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. शिंदे यांनी त्यावर शेरा मारला आहे. एकीकडे महापालिकेतील या दोन्ही पक्षाचे नगरसेवक तावडे हॉटेल –गांधीनगर परिसरातील बेकायेदशीर बांधकामावर कारवाई व्हावी असे म्हणत आहेत. दुसरीकडे त्या पक्षाचे नेते मात्र कारवाईला स्थगितीसाठी प्रयत्न करत आहेत. तेव्हा भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या नेतेमंडळींनी गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामासंबंधी भूमिका लोकांसमोर मांडावी. जेणे करुन दूध का दूध, पाणी का पाणी हे स्पष्ट होईल.’असे इंदूलकर व देसाई यांनी म्हटले. महापालिका प्रशासनाची भूमिका ही दुटप्पी असल्याचा आरोप कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes