Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटपशिवसेनेचा साठावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरागायक पंडित विनोद डिग्रजकरांनी अमेरिकत उलगडला बंदिशींचा खजानाटीईटी परीक्षेसाठी राज्यभरात सहा लाखावर परीक्षार्थी, १८ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉचगांधीनगर परिसरातील बांधकामाबाबत भाजप - शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, सुनील मोदींनी तो व्हिडिओ दाखवावाशिवाजी विद्यापीठातर्फे ४१० विद्यार्थ्यांना २९ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती प्रदानशिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवारब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे श्री राम कथाचे आयोजनत्या शिक्षकांना टीईटीतून सवलत मिळावी - भरत रसाळे

जाहिरात

 

ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे श्री राम कथाचे आयोजन

schedule18 Jun 26 person by visibility 102 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम कोल्हापूरतर्फे श्रीराम कथा आणि श्री राम यज्ञ  आयोजित केले आहे. पुणे येथील निरूपणकार मकरंद सुमंत रामदासी हे राम कथा ऐकविणार आहेत. तसेच हभप गोविंद मांडवगणे हे संहिता वाचन करणार आहेत. २२ जून ते २८ जून २०२६ दरम्यान दररोज संध्याकाळी चार ते रात्री ८.३० या वेळेत राम गणेश गडकरी हॉल पेटाळा येथे श्रीराम कथा निरूपण होणार आहे, अशी माहिती ब्राह्मण सभा करवीर चे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या कार्यक्रमांतर्गत मंगलधाम येथून २१ जून रोजी ग्रंथ दिंडीचे आयोजन केल आहे. वारकरी विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी सकाळी ९.०० वाजता मंगलधाम येथून निघून महाद्वार रोड, पापाची तिकटी, दक्षिणद्वार मार्गे पुन्हा मंगलधाम येथे संपणार आहे. या दिंडीमध्ये हणबरवाडी येथील  माऊली भक्त वारकरी विद्यालय येथील ४० बालचमूंचा समूह सहभागी होणार आहे.
२२ जून रोजी कुश
-लव रामायण गाती, २३ जून रोजी अयोध्या वर्णन व श्री राम जन्म, २४ जून रोजी योगवशिष्ठ, श्रीराम, भरत, लक्ष्मण शत्रुघ्न यांचे विवाह आणि अयोध्येत राज्याभिषेकाची तयारी,  २५ जून रोजी श्रीराम वनाभिगमन केवट, २६ जून रोजी अगस्ती - श्रीराम भेट, पंचवटी सीताहरण , २७ जून रोजी शबरी सुग्रीव मैत्री सुंदरकांड याविषयी प्रवचन होईल. रविवारी २८ जून रोजी सकाळी ९.३० वाजता रावण वध श्रीराम राज्याभिषेक आणि त्यानंतर महाप्रसाद होईल.दरम्यान शुक्रवार २६ जून रोजी सकाळी नऊ वाजता मंगलधाम येथे श्रीराम यज्ञ होणार आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष किरण  धर्माधिकारी, कार्यवाह श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, प्रसाद खाडिलकर, संतोष कोडोलीकर, अशोक जोशी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes