Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेची कडक पावले !  मिळकतधारकांवर सक्त कारवाई, कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार !!हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची शिवाजी विद्यापीठातून पीएचडीठठ ददरंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणाउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपणशाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !जिल्हा नियोजनचा २९२ कोटीचा निधी , आमदार -मंत्र्यांची नको भागिदारी ! शंभर टक्के निधी हवा जिप सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांची सह्यांची मोहीम ! ! जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

रंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणा

schedule28 Jul 26 person by visibility 197 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खाजगीकरणाच्या विरोधात मंगळवारी रंगकर्म मोठ्या संख्येने स्त्यावर उतरले. नाट्यगृहासमोरच भर पावसात त्यांनी आंदोलन करत खाजगीकरणाला विरोध केला. खाजगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. 

रंगकर्मी सुनील घोरपडे, अभिनेता  सागर तळाशीकर, आनंद काळे, अभिनेता स्वप्नील राजशेखर, कला शिक्षक सागर बगाडे, प्रसाद जमदग्नी, धनंजय पाटील, हर्षल सुर्वे, दिनेश माळी, किरणसिंह चव्हाण, रोहन घोरपडे, युवराज घोरपडे, सुनील माने, राजश्री खटावकर, सर्जेराव पाटील, सचिन मोरे, अमर मोरे, भालचंद्र काळे यश शिंदे श्रेयस सोनार प्रा.  ए जी जोशी,  सतीश स्वामी, संग्राम भालकर, पद्माकर कापसे , धनंजय पाटील, संजय हळदीकर नरहर कुलकर्णी, किरणसिंह चव्हाण, उमेश पोवार, अमित अडसुळे, पंडित कंदले, शाहीर दिलीप सावंत आदींचा समावेश होता . 'संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण थांबवा,  मी, छत्रपती शाहू राजांचा वारसा- मला दुसऱ्यांच्या घरी बांधू नका' अशा आशयचे फलक कलाकारानी हातात घेऊन आंदोलन केले. 'रद्द करा रद्द करा, केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण रद्द करा, नाट्यगृहाचे खाजगीकरण करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो.' अशा घोषणा देत रंगकर्मीकोल्हापूर महापालिकेचा निषेध केला. महापालिका प्रशासनाने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes