Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेची कडक पावले !  मिळकतधारकांवर सक्त कारवाई, कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार !!हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची शिवाजी विद्यापीठातून पीएचडीठठ ददरंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणाउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपणशाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !जिल्हा नियोजनचा २९२ कोटीचा निधी , आमदार -मंत्र्यांची नको भागिदारी ! शंभर टक्के निधी हवा जिप सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांची सह्यांची मोहीम ! ! जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेची कडक पावले !  मिळकतधारकांवर सक्त कारवाई, कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार !!

schedule28 Jul 26 person by visibility 84 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ‘थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.  ३५ टक्क्यांपेक्षा कमी वसुली करणाऱ्या लिपिकांना नोटिसा देण्याचे तसेच अत्यल्प वसुली करणाऱ्यांचा पगार तातडीने रोखावेत’असे आदेश आयुक्त राजेंद्र भारुड यांनी  दिले. पुढील महिन्यापर्यंत कामगिरीत सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कोल्हापूर शहरातील थकीत घरफाळा वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीदार मिळकतधारकांवर सक्तीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त भारुड यांनी घरफाळा विभागास दिले.  भागाची लिपिकनिहाय आढावा बैठक घेणत आली.

   शहरातील अनधिकृत मिळकतीभाडेकरू वापर असूनही मालक वापराप्रमाणे आकारणी झालेल्या प्रकरणांची तातडीने दुरुस्ती करून दंडासह वसुली करावीतसेच अनधिकृत लॉजिंग व व्यावसायिक मिळकतींवर आवश्यकतेनुसार सीलची कारवाई करावीअसे आदेश दिले. थकबाकीदारांना तत्काळ नोटिसा व एसएमएस पाठविणेशहरातील सर्व पात्र मिळकतींना घरफाळा आकारणी करणे आणि व्यावसायिक मिळकतींची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. नियमित घरफाळा भरणाऱ्या नागरिकांना त्रास न देता अधिकारांचा योग्य वापर करून थकबाकीदारांवर कारवाई करावीतसेच दर १५ दिवसांनी वसुलीचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            या बैठकीस उपआयुक्त परितोष कंकाळसहायक आयुक्त उज्वला शिंदेस्वाती दुधाणेकरनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाडकरअधीक्षक अशोक यादवमदन ठाणेकरदत्तप्रसाद माजगांवकरअच्युत अडुकर, अधिक्षक अर्चना प्रभावळे तसेच घरफाळा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

………………

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes