Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !जिल्हा नियोजनचा २९२ कोटीचा निधी , आमदार -मंत्र्यांची नको भागिदारी ! शंभर टक्के निधी हवा जिप सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांची सह्यांची मोहीम ! ! जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफशिक्षण विभागाच्या कारभाराची दबक्या आवाजात चर्चा व्हायला नको : मंत्री मुश्रीफांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाविद्यार्थिनींच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभारू या : डॉ. जगन्नाथ पाटील खासगीकरणाला रंगकर्मींचा विरोध, मंगळवारी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलनसंमेलन शाहू कार्य संवर्धनाचे !  निर्धार शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्याचे ! !जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी  स्वप्निल घस्तेजागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान, प्रशिक्षणर्थींना प्रमाणपत्र वितरण उत्साहातगुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारी

जाहिरात

 

शाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !

schedule27 Jul 26 person by visibility 69 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काही वर्षापूर्वी शाळेची पटसंख्या दोन अंकीकेवळ ३५ विद्यार्थी शाळेत. मात्र मुख्याध्यापक व शिक्षकांनी संकल्प केला. पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करायचे. शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेतलं. गावकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेचे महत्व पटवून दिलं. त्यांनीही साथ दिली. शैक्षणिक उपक्रमावर भर दिला. फलस्वरुप म्हणजे, शाळेच्या पटसंख्येचा आलेख उंचावत गेला. आज त्या शाळेत तब्बल १२०० हून अधिक विद्यार्थी शिकतात. विशेष म्हणजे, ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा अभियान’मध्ये या शाळेने विभागीयस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. राज्यस्तरीय मूल्याकंनासाठी शाळा पात्र ठरलीय. ही किमया घडली आहे, ‘पीएमश्री कुमार विद्या मंदिर ३ कुरुंदवाड.’या शाळेत.  या चमकदार शैक्षणिक कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेतर्फे त्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा सोमवारी (२७ जुलै २०२६)विशेष सन्मान झाला.

 वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक रविकुमार पाटील, शिक्षक शंकर दिवटे, विकास पोवार, शिवाजी शिंदे, बाबासाहेब प्रदाने यांचा सत्कार करण्यात आला. मानचिन्ह देऊन गौरविले. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल यादव, समाजकल्याण समिती सभापती श्रध्दा गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ यांनी मुख्याध्यापक पाटील व अन्य शिक्षकांच अभिनंदन केले. शाळेची पटसंख्या ३५ वरुन १२०० पर्यंत पोहोचली आहे असे सांगताच मंत्री मुश्रीफ यांनी,‘छान, साऱ्यांचे अभिनंदन’अशा शब्दांत शाबासकीची थाप दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes