Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदानअनुवादक हा भाषा -संस्कृतीमधील नाविक, वर्षा गगराणींची साहित्यिक कामगिरी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदविली जाईल : डॉ. दामोदर खडसेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावाशिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार!  शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेवर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळाआदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणार

जाहिरात

 

अनुवादक हा भाषा -संस्कृतीमधील नाविक, वर्षा गगराणींची साहित्यिक कामगिरी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदविली जाईल : डॉ. दामोदर खडसे

schedule18 Oct 26 person by visibility 147 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘अनुवादक हा दोन भाषा आणि संस्कृतींमधील 'नाविक' असतो, जो विचार आणि साहित्य एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवतो. अनुवादात मूळ भाषेचा भाव, संस्कृती आणि भावनिक खोली अचूकपणे उतरवणे हे मोठे आव्हान असते. ज्या अनुवादात मूळ मजकुरातून काहीही वगळले जात नाही आणि स्वतःहून काहीही वाढवले जात नाही, तोच खरा आणि परिपूर्ण अनुवाद ठरतो. मराठीतून हिंदीत भाषांतर करताना प्रतिभेचा कस लागतो. मराठी शब्दाला हिंदीत योग्य पर्यायी शब्द शोधून लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते. लेखिका वर्षा गगराणी यांनी वयाच्या ८३ व्या वर्षीही केलेले पुस्तकांचे भाषांतर अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या या साहित्यिक लेखन उपक्रमाची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद होण्यासारखी आहे.’ असे गौरवोदगार हिदीतील प्रख्यात साहित्यिक डॉ. दामोदर खडसे यांनी काढले.

मराठी साहित्याचा समृद्ध वारसा हिंदी भाषिक वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका वर्षा गगराणी  यांनी मराठीतून हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या तब्बल १४ पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांचा भाषेवरील व्यासंग आणि साहित्य निर्मितीची ऊर्जा थक्क करणारी असून, ग्रंथाली व राजकमल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात त्यांच्या या अमूल्य प्रवासाचा गौरव करण्यात आला.
कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमास संपादक हुबनाथ पांडे,
  अशोक माहेश्वरी, रमन मिश्र, राकेश शर्मा, अरुण पुराणिक, संजय कृष्णाजी पाटील, अशोक गगराणी, भूषण गगराणी, डॉ. सुनिलकुमार लवटे, डॉ. कविता गगराणी, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, कार्यक्रमाचे संयोजक धनश्री धारप यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनुवादिका वर्षा गगराणी म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीचे जीवन एका कादंबरीसारखे असते. आपल्या प्रवासात कुटुंबाचे योगदान सर्वात महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील चढ-उतार आणि साहित्य प्रवासाचा सविस्तर पट उपस्थितांसमोर मांडला. घरातील आणि बाहेरील जबाबदारी पार पाडताना स्त्रियांना पुरषांच्या आणि पुरुषांना स्त्रियांची गरज असते असेही त्यांनी यावेळी सांगितले. संजय कृष्णाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात 'ग्रंथाली' चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला.  'ग्रंथाली'च्या सुरुवातीच्या काळात विजय तेंडुलकर, कुमार केतकर, रवींद्र लागू, अरुण साधू आणि दिनकर गांगल यांच्यासोबत काम करताना एसटी बसच्या छतावर पुस्तकांचे गठ्ठे चढवल्याचे त्यांनी सांगितले.  

 लेखक अरुण पुराणिक यांनी देवानंद यांचा 'हम दोनों' चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमाच्या प्रेमात पडल्याची आणि गिरगावातील शाळेच्या दिवसांत नियमित चित्रपट पाहिल्याची आठवण त्यांनी सांगितले.  भारतीय चित्रपटसृष्टीची पाळेमुळे मुंबईत असली, तरी ती खरी बहरली आणि फुलली ती कोल्हापुरात बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर यांच्या योगदानाचा आणि ऐतिहासिक चित्रपटांत वापरल्या गेलेल्या तांग्याच्या घोड्यांच्या वैशिष्ट्यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.   डॉ. मृण्मयी भजक यांनी सूत्रसंचालन  केले. कार्यक्रमाला कारखानदार सचिन मेनन, साजिद हुदली, साहित्यिक डॉ. बी. एम. हिर्डेकर, समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. तृप्ती करेकट्टी, विनय पाटील, दादासाहेब मोरे, विमल मोरे, प्राचार्य अजेय दळवी, बांधकाम व्यावसायिक विजय अग्रवाल, अवनी संस्थेचे संजय पाटील, अनमोल कोठडिया, डेप्युटी इंजिनीअर नाना पाटील, प्रा सुरेश शिखरे, प्रा.शिवाजी जाधव,  डॉ. आलोक जत्राटकर, प्रा. अमरसिंह शेळके, किरण पाटोळे प्रा. प्रकाश मुंज, आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes