मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावा
schedule18 Oct 26 person by visibility 194 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे व डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी १९ ऑक्टोबर २०२६ कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉल येथे पदवीधर व शिक्षकांचा मेळावा होत आहे. दुपारी २.३० वाजता मेळावा होणार आहे. पुणे विभागीय मतदारसंघात महायुतीतंर्गत शिक्षक व पदवीधर या दोन्ही जागा भाजपला मिळाल्या आहेत. शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे व पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव या उमेदवार आहेत.