देसाई - मोरे कुटुंबातील नवीन पिढी पृथ्वीच्या माध्यमातून समाज - राजकारणात
schedule19 Jul 25 person by visibility 100 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "देसाई - मोरे कुटुंबीय हे समाजकारण व राजकारणात पहिल्यापासून सक्रिय आहेत. शिक्षण क्षेत्रातही या कुटुंबातील सदस्यांची योगदान आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासनाधिकारी पृथ्वी अजित मोरे यांच्या माध्यमातून देसाई मोरे कुटुंबातील नवीन पिढी समाज व राजकारणात सक्रिय झाली आहे." असे उद्गगार मान्यवरांनी काढले.
निमित होते, शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासनाधिकारी पृथ्वी मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. रविवारी 18 जुलै रोजी पृथ्वी मोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. न्यू शाहूपुरी येथे हा कार्यक्रम झाला. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राध्यापक जयकुमार देसाई, चेअरमन प्राध्यापिका डॉक्टर मंजिरी मोरे देसाई, शिक्षण प्रसारक मंडळाचे दौलत देसाई, परिवहन समितीचे माजी सभापती अजित मोरे, शेतकरी संघाचे संचालक अजितसिंह मोहिते आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी जयकुमार देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई यांनी पृथ्वी मोरे यांना शुभेच्छा देताना देसाई -मोरे कुटुंबातील नवीन पिढी आता पृथ्वीच्या माध्यमातून समाजकारण- राजकारणात सक्रिय झाली आहे. आगामी काळात त्यांना नक्कीच जनतेचा कौल मिळेल. असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी विविध संस्था संघटना तालीम संस्था व तरुण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.