Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चार्टर्ड अकौंटंट्स  कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी सीए आशिष सेवेकरी, उपाध्यक्षपदी अलोक शहा कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड सतरा मार्चला ! पंचायत समिती सभापती दहा मार्चला निवडणार!!शिक्षण घेणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणं नव्हे तर माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे - कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहातकृष्णराज महाडिकांचे  रविवारी कोल्हापुरात होणार  जल्लोषी स्वागतडीवाय पाटील पॉलिटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिकअक्षरांच्या दुनियेतील ‘मनोहर’ प्रवास ! महापालिका शाळेत ‘लेखक आपल्या भेटीला’ सोहळा!!महापौरांनी केली पुतळयाची स्वच्छता, उपमहापौरांकडून धूर फवारणी ! आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई! !न्यू कॉलेज, सेवकांची पतसंस्था चेअरमनपदी पी. डी. चौगले, व्हाइस चेअरमनपदी एस. पी. मानेशाहू महाराज हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त  बालवाद्यवृंदाचा मराठी गीत गायन कार्यक्रम

जाहिरात

 

महापौरांनी केली पुतळयाची स्वच्छता, उपमहापौरांकडून धूर फवारणी ! आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई! !

schedule27 Feb 26 person by visibility 90 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहर स्वच्छतेवरुन सभागृह गाजविणारे आणि कर्मचाऱ्यांना आदेश सोडणारे महापालिकेचे पदाधिकारी- नगरसेवक आणि अधिकारी, शुक्रवारी रस्त्यावर उतरले. त्यांच्यापैकी कोणी झाडू हाती घेतला तर कोणी कचरा उठाव केला. ‘माझं शहर - माझी जबाबदारी’असा नारा देत ही सारी मंडळी स्वच्छतेसाठी सरसावली. प्रोटोकॉल आणि अधिकारपदाची झूल बाजूला ठेवत सगळेजण ’स्वच्छ कोल्हापूर’साठी एकवटले. विशेष म्हणजे, महापालिका सभागृहात एकमेकांविरोधात कुरघोडीचे राजकारण करणारे सत्ताधारी आणि विरोधी आघाडीचे सदस्य मतभेद विसरुन स्वच्छता अभियानात सहभागी झाले.

निमित्त होतं, महापौर रुपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘ माझं शहर – माझी जबाबदारी’या स्वच्छता अभियानाचे. शुक्रवारी, (२७ फेब्रुवारी २०२६) दिवसभर हा उपक्रमाची अंमलबजावणी झाली. स्वच्छता मोहिमेत शहरातील प्रमुख मार्गांचा समावेश होता विभागीय कार्यालय क्रमांक एक. अंतर्गत ( महात्मा गांधी मैदान परिसर) : शेंडा पार्क ते इंदिरा सागर हॉल, आर.के. नगर नाका ते शेंडा पार्क चौक, रंकाळा टॉवर ते तलवार चौक, तलवार चौक ते शालिनी पॅलेस, तलवार चौक ते चिवा चौक (जुना वाशी नाका) येथे स्वच्छता करण्यात आली. विभागीय कार्यालय क्रमांक दोन  (छत्रपती शिवाजी मार्केट परिसर) अंतर्गत रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, दसरा चौक ते उमा टॉकीज ते रेणुका मंदिर चौक ते हॉकी स्टेडियम येथे आयोजन केले होते. विभागीय कार्यालय क्रमांक तीन  (राजारामपुरी परिसर) अंतर्गत  छत्रपती शाहू मिल चौक ते केएसबीपी चौक ते टेंबलाई नाका, कावळा नाका ते दाभोळकर कॉर्नर चौक ते दसरा चौक परिसरात स्वच्छता करण्यात आली. विभागीय कार्यालय क्रमांक चार (छत्रपती  ताराराणी मार्केट परिसर) अंतर्गत टेंबलाई नाका ते कावळा नाका ते धैर्यप्रसाद चौक, सीपीआर चौक ते कलेक्टर ऑफिस चौक ते धैर्यप्रसाद हॉल, तसेच तावडे हॉटेल ते कावळा नाका येथे स्वच्छता करण्यात आली.

या मोहिमेतंर्गत रस्ते, दुभाजक व फुटपाथ यांची स्वच्छता करण्यात येणार असून रस्त्यावरील साचलेली खरमाती, तणकट तसेच फुटपाथवरील अडथळा निर्माण करणारी झाडे-झुडपे हटवली. महापौर निकम, उपमहापौर अक्षय जरग, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सभागृह नेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह नगरसेवक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले. महापौर निकम यांनी कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी पुतळा परिसरात स्वच्छता केली. रणरागिणी ताराराणी पुतळयाची स्वच्छता केली. तसेच कचरा उठाव केला. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी विविध भागात जाऊन मोहिमेत सहभाग घेतला. उपमहापौर अक्षय जरग यांनी दुचाकीवरुन धूर फवारणी केली.  प्रत्येक भागामध्ये नगरसेवक, नागरिक पुढाकार घेत ‘स्वच्छ कोल्हापूर’साठी स्वच्छता अभियानमध्ये उतरले. या स्वच्छता मोहिमेत 30 टन कचरा संकलित झाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes