नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात
schedule27 Feb 26 person by visibility 39 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये ज्ञानपीठ विजेते लेखक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा झाला. कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक धनंजय बेदरे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थिनी श्रुती पाटीलने कुसुमाग्रजांबद्दल, त्यांच्या लेखन साहित्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मराठी अभिमानया विषयावरील भित्तीपत्रिका तयार केली होती. यामध्ये कुसुमाग्रज, मराठीचे महत्त्व सांगणारी माहिती, म्हणी वाक्प्रचार, कुसुमाग्रजांचा जीवनपट असे विविध विषयांवर लेखन केले होते. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषिक खेळांचे आयोजन असा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले होते. होते.कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभागप्रमुख विनय शिंदे, एकता सोळुंके व पल्लवी कुलकर्णी या शिक्षकांनी केले. विद्यार्थिनी ईश्वरी डोईफोडे हिने स्वागत तर विद्यार्थिनी इंद्रायणी मच्छेने आभार मानले. .