Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चार्टर्ड अकौंटंट्स  कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी सीए आशिष सेवेकरी, उपाध्यक्षपदी अलोक शहा कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड सतरा मार्चला ! पंचायत समिती सभापती दहा मार्चला निवडणार!!शिक्षण घेणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणं नव्हे तर माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे - कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहातकृष्णराज महाडिकांचे  रविवारी कोल्हापुरात होणार  जल्लोषी स्वागतडीवाय पाटील पॉलिटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिकअक्षरांच्या दुनियेतील ‘मनोहर’ प्रवास ! महापालिका शाळेत ‘लेखक आपल्या भेटीला’ सोहळा!!महापौरांनी केली पुतळयाची स्वच्छता, उपमहापौरांकडून धूर फवारणी ! आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई! !न्यू कॉलेज, सेवकांची पतसंस्था चेअरमनपदी पी. डी. चौगले, व्हाइस चेअरमनपदी एस. पी. मानेशाहू महाराज हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त  बालवाद्यवृंदाचा मराठी गीत गायन कार्यक्रम

जाहिरात

 

शिक्षण घेणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणं नव्हे तर माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे - कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव 

schedule27 Feb 26 person by visibility 103 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महर्षी कर्वे, बाया कर्वे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांसारख्या महामानवांप्रति आपण सदैव कृतज्ञ राहायला हवे. शिक्षण घेणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणं नव्हे तर शिक्षणामुळे सामाजिक भान येणे, माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे आहे. कौशल्य शिकणे यापेक्षा ते प्रत्यक्षात उपयोगात आणणे गरजेचे आहे. मराठी भाषेचा अभिमान आपल्या प्रत्येक कृतीतून व्यक्त व्हायला हवा.’असे प्रतिपादन एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्या कुलगुरू प्रो. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले.
       श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या न्यू कॉलेजच्यावतीने शुक्रवारी, (२७ फेब्रुवारी २०२६) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जनजागृती कार्यक्रम व मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमा प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत  होत्या. त्या न्यू कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत.भाषणात त्यांनी कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमासाठी एसएनडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर विशेष उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीची आवश्यकता स्पष्ट केली. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूरचे चेअरमन डॉ. के.जी. पाटील अध्यक्षस्थानी होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. शाळा बाह्य मूल्यांकन समितीकडून न्यू कॉलेजच्या कनिष्ठ विभागास अ + दर्जा प्राप्त केल्याबद्दल समितीचा तसेच वनस्पती शास्त्रातील आंतरराष्ट्रीय संशोधनाची दखल घेऊन लंडन येथील शास्त्रज्ञांनी वनस्पतीच्या एका प्रजातीचे "मुगाया शिंपली" असे नामकरण केल्याबद्दल डॉ.व्ही.बी. शिंपले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी, अवनि संस्था व न्यू कॉलेजच्या समाजशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागातर्फे भरविलेल्या सेंद्रिय भाजीपाला व वाळवण महोत्सवातील बक्षीसपात्र शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. . मनीषा नायकवडी यांनी मराठी अभिमान गीत गायिले. कार्यक्रमास संस्थेचे व्हाइस चेअरमन प्रा. डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय .एस.चव्हाण, संचालक वाय.एल. खाडे, पी.सी. पाटील, डॉ. सी.आर. गोडसे, प्रा. विनय पाटील, आजीव सेवक उदय पाटील, डॉ. एस.जी.जगताप, प्रा. एम.बी. गडदे, आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य डॉ. दुधगीकर, अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय डॉ.ए. ए. कलगोंडा यांनी करून दिला. प्रा.डॉ. निलेश पवार यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes