न्यू कॉलेज, सेवकांची पतसंस्था चेअरमनपदी पी. डी. चौगले, व्हाइस चेअरमनपदी एस. पी. माने
schedule27 Feb 26 person by visibility 42 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील न्यू कॉलेज, सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी पी. डी. चौगले व व्हाइस चेअरमनपदी एस. पी. माने यांची निवड झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची शुक्रवारी, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी बैठक झाली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक अधिकारी ए. एस. हारुगले हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. चेअरमनपदी चौगले व व्हाइस चेअरमनपदी माने यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर बोलताना नूतन पदाधिकाऱ्यांनी, ‘पतसंस्थेची वाढ व सभासदांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू’ असे सांगितले. संचालक उमेश जाधव यांनी आभार मानले.