शाहू महाराज हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त बालवाद्यवृंदाचा मराठी गीत गायन कार्यक्रम
schedule27 Feb 26 person by visibility 51 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जुना बुधवार पेठ परिसरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला .प्रारंभी मराठी विभाग प्रमुख शिक्षिका बी .एन .थोरात यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, मुख्याध्यापक बी.जे. सावंत, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एस .व्ही .पोवार उपस्थित होते. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख थोरात यांनी कुसुमाग्रजांची माहिती सांगितली. मराठी भाषेची थोरवी व्यक्त केली. संगीत शिक्षक महेश हिरेमठ व एस.टी .पाटील यांनी आपल्या बालवाद्यवृंदासह ‘लाभले भाग्य आम्हास , मोरया, देहाची तिजोरी,अभिर गुलाल, शोधिसी मानवा, विठ्ठलगीत ,शूर आम्ही सरदार , चिकमोत्याची माळ’ अशी भक्तीगीते सादर केली. विद्यार्थिनी रिद्धी चौगुले व अक्षता होगाडे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षिका एस.आय चौगुले यांनी आभार मानले