Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली प्रशासकीय मंडळची भेटसर्जन्स वीकनिमित्त कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे सामाजिक उपक्रम चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांचे पॅनेल विजयी, 17 पैकी सोळा जागा जिंकल्यामहामानवांच्या विचारकार्यांचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे - पालकमंत्री प्रकाश आबिटकर वीरशैव लिंगायत समाजातर्फे गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कारविकास प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव…नांगरट साहित्य संमेलनात सरकारी धोरणावर ओढले आसूडकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या भोगावती शाखेचा प्रथम वर्धापनदिन साजरागोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजराचित्रपट महामंडळासाठी कोल्हापूर-पुण्यात चुरशीने मतदान, सोमवारी मतमोजणीडॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या भोगावती शाखेचा प्रथम वर्धापनदिन साजरा

schedule08 Jun 26 person by visibility 125 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या भोगावती शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाखा संचालक जी. ए. पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन सुरेश कांबळे सर, व्हाईस चेअरमन  कपिल पोवार, संचालक जहांगीर मुलाणी, डी. डी. पाटील, के. वाय. कुंभार, गुंगा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चेअरमन कांबळे यांनी ग्राहकांशी हितगुज साधत संस्थेची ध्येयधोरणे, भावी नियोजन व विकासाचा दृष्टीकोन याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच पुढील वाटचालीत सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले. अवघ्या १२ महिन्यांच्या कालावधीत शाखेने प्रभावी कार्यनीतीच्या बळावर ५ कोटींचा व्यवसाय पूर्ण करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. सोनेतारण, गृहतारण, मालमत्ता तारण आदी विविध कर्ज योजनांद्वारे ग्राहकांना सेवा देत असताना थकबाकीचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात संस्थेला मोठे यश मिळाले आहे. ही बाब संस्थेच्या सक्षम व्यवस्थापनाची आणि ग्राहकांच्या विश्वासाची साक्ष देणारी असल्याचे नमूद केले.

ग्राहकांनी संस्थेच्या सेवाभावी वृत्ती, लोकाभिमुख कार्यपद्धती, सूक्ष्म नियोजन आणि विश्वासार्ह सेवेमुळे समाधान व्यक्त करत संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनानिमित्त हितचिंतक, ग्राहक व सभासदांनी मिळून २८ लाखांच्या नवीन ठेवी संस्थेकडे जमा करून संस्थेवरील विश्वास अधिक दृढ केला अशा शब्दांत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋतुपूर्ण कांबळे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes