गोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा
schedule07 Jun 26 person by visibility 89 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ.चंद्रकांत परूळेकर, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.दयावर्धन कामत, धनाजी पाटील, डॉ.प्रकाश दळवी, अशोक पुणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.