Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली प्रशासकीय मंडळची भेटसर्जन्स वीकनिमित्त कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे सामाजिक उपक्रम चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांचे पॅनेल विजयी, 17 पैकी सोळा जागा जिंकल्यामहामानवांच्या विचारकार्यांचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे - पालकमंत्री प्रकाश आबिटकर वीरशैव लिंगायत समाजातर्फे गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कारविकास प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव…नांगरट साहित्य संमेलनात सरकारी धोरणावर ओढले आसूडकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या भोगावती शाखेचा प्रथम वर्धापनदिन साजरागोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजराचित्रपट महामंडळासाठी कोल्हापूर-पुण्यात चुरशीने मतदान, सोमवारी मतमोजणीडॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

जाहिरात

 

महामानवांच्या विचारकार्यांचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

schedule08 Jun 26 person by visibility 182 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अध्यासनांची उभारणी आणि विस्तार यासाठी सरकार सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महामानवांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने तेथे त्यांच्या विचारकार्याचा नियोजनबद्ध अभ्यास आणि संशोधन व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठामध्ये कोल्हापूर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या आर्थिक सहकार्यातून बांधण्यात आलेल्या शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि उद्घाटन मंत्री आबिटकर यांच्या हस्त झाले. त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महात्मा बसवेश्वर हे युगप्रवर्तक क्रांतीकारक होते. नितीमूल्यांवर चालणारा समाज त्यांना अभिप्रेत होता. त्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला. त्यांचे जीवनचरित्र आणि कार्य यांच्यावर विद्यापीठात मोठे संशोधनकार्य व्हावे आणि त्याला भरीव सामाजिक पाठबळ लाभावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार सतेज पाटील यांनी बसवेश्वरांचे विचार जागतिक पातळीवर नेण्यासाठी या अध्यासनाच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी शरण साहित्यामधील समता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ प्रयत्नशील राहील, याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मंत्री आबिटकर आणि मुश्रीफ यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण आणि फीत सोडवून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. अधिसभा सदस्य अॅड. अभिषेक मिठारी, सुर्यकांत पाटील-बुद्‌ध्याळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, चन्नबसवानंद स्वामीजी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रघुनाथ धमकले, रजनी मगदूम, डॉ. जी.पी.माळी, सरला पाटील, डॉ. गिरीष कुलकर्णी, डॉ. सतीश घाळी, चंद्रशेखर डोल्ली, डॉ. विश्वनाथ मगदूम, राजू दड्डी, बसवराज आजरी, राहुल नष्टे, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकडली, बाबूराव तारळी, राजशेखर तंबाके, अनिल सोलापुरे, राजेश पाटील-चंदूरकर, सुरेश हुपरे, मल्लाप्पा चौगुले, वास्तुविशारद जीवन बोडके, अभियंता रणजीत यादव  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes