युवाशक्ती दहीहंडीचा थरार २४ ऑगस्टला रंगणार, प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस
schedule09 Aug 25 person by visibility 90 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ३ लाख रूपयांचे बक्षिस दिले जाईल. असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जाईल. यंदाही युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. तर स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात पाच थर लावून सलामी देणार्या गोविंदा पथकाला प्रोत्साहन म्हणून ५ हजार रूपये दिले जातील. तर सहा थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १० हजार रूपये आणि सात थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. शिवाय भागीरथी महिला संस्थेकडून सर्व गोविंदा पथकांसाठी फुड पॅकेट वितरीत केले जाते.
युवाशक्ती दहीहंडीच्या निमित्ताने छायाचित्रण स्पर्धाही आयोजित केली आहे. सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना अनुक्रमे ७, ५ आणि ३ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. यावर्षी तरूणाईच्या मागणीवरून युवाशक्ती दहीहंडी रिल्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात येत आहे. सर्वोत्तम रिल्स बनवणार्यांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिले जातील. प्रारंभी श्रीमंत ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृतिक कार्यक्राम सादर होईल. पत्रकार परिषदेला पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, उत्तम पाटील, प्रमोद पाटील, सागर बगाडे, विजय टिपुगडे, राजेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते.