Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी महामंडळ करणार सरकारकडे पाठपुरावा, फेब्रुवारीत मराठी चित्रपट संमेलनअजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाणांची बदलीबांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानगांधीनगरमधील अनधिकृत  इमारती पूर्णपणे निष्कासित करा, माजी नगरसेवक संघटनेची मागणीविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यासाठी  तातडीने कारवाई करावी - ठेवीदारांची मागणी ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचे भर पावसात आंदोलन ! कौस्तुभ गावडे, दादासाहेब लाड यांचा पाठिंबा !!क्रीडाई कोल्हापूरतर्फे योग दिन साजराउद्धव ठाकरे अन् कार्यकर्त्यांमधील नाते घट्ट, फुटीर खासदारांना मतदार धडा शिकवतीलमहापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणारराज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरण

जाहिरात

 

पुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी महामंडळ करणार सरकारकडे पाठपुरावा, फेब्रुवारीत मराठी चित्रपट संमेलन

schedule23 Jun 26 person by visibility 37 categoryसामाजिक

चित्रपट महामंडळाचे ४५ हजार सभासद होणार अ वर्ग,

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नूतन कार्यकारिणीची बैठक मंगळवारी, २३ जून २०२६ रोजी पुणे येथे झाली. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज  राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, महामंडळाचे २०१५ पासून सदस्य असलेल्या आणि किमान तीन वर्षे सक्रिय काम केलेल्यावर्ग सभासदांनावर्ग सभासद म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. याचा लाभ सुमारे ४५ हजार सभासदांना होणार आहे. पुण्यात स्वतंत्र चित्रनगरी उभारण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे त्यासंबंधी चर्चा झाली.

 महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार सुनील महाजन, सहकार्यवाह दीपक कदम, सहकार्यवाह प्रवीण पाटील ऊर्फ वासू पाटील, सहखजिनदार शरद चव्हाण, विजय खोचीकर, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, सुभाष नकाशे, राज काझी, वर्षा उसगावकर, अजित शिरोळे, गणेश  गारगोटे, विकास तोरणे उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेभोसले यांनी, ‘ मराठी चित्रपट क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 'पहिले मराठी चित्रपट संमेलन' फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणांचा विचार सुरू आहे. चित्रपट क्षेत्रातील सुमारे ६० हजार कलाकार तंत्रज्ञांचा पुढील तीन महिन्यांत आरोग्य विमा उतरविण्याचा संकल्प महामंडळाने केला आहे. तसेच सर्व सदस्यांचे डिजिटलायझेशन करून त्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली

सोबतच मुंबई पुणे येथे महामंडळाचे स्वतःचे गेस्ट हाऊस उभारणी, कंटेनर थिएटरची संकल्पनाही राबविण्यात येणार आहे. पुण्यात स्वतंत्र चित्रनगरी उभारण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी स्पष्ट केले.

तसेच भविष्यात महामंडळाचे सभासदत्व पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून संपूर्ण प्रणालीचे डिजिटायझेशन होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आलीमुख्य कायदेशीर सल्लागार म्हणून पूर्वीप्रमाणेच ॲड. प्रशांत पाटील काम पाहणार असून पुण्यासाठी ॲड. मंदार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes