ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचे भर पावसात आंदोलन ! कौस्तुभ गावडे, दादासाहेब लाड यांचा पाठिंबा !!
schedule23 Jun 26 person by visibility 482 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या ऑनलाईन संच मान्यतेतल्या त्रुटी दूर करून प्रचलित पद्धतीने संच मान्यता करावी. तसेच 45 मिनिटांची तासिका पूर्ववत करावी यासह विविध मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मंगळवारी 23 जानेवारी 2026 रोजी झालेल्या या आंदोलनात शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिक्षकानी भर पावसात आंदोलन करत लक्ष वेधले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कोजिमाशि पतसंस्थेचे तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. 'शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत लढा देत राहू.'अशी ग्वाही कौस्तुभ गावडे यांनी दिली. गावडे व लाड त्यात आता तुमचा कमीच घेता त
ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांची ऑनलाइन पद्धतीने संच मान्यता करण्याचा निर्णय झाला आहे त्याला जुनियर कॉलेजच्या शिक्षकांनी विरोध केला आहे ऑफलाईन पद्धतीने संच मान्यता करावी तसेच वीस विद्यार्थ्यांची बॅच प्रॅक्टिकल साठी ग्राह्य धरावी. दोन विषय घेऊन पूर्ण वेळ झालेल्या शिक्षकांना प्रचलित पद्धतीने मान्यता द्यावी अर्धवेळ शिक्षकांना ऑनलाईन संचमान्यतेमध्ये होणारा अन्याय दूर करून अर्धी वर्षी पदे कायम करावेत यासाठी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक आंदोलन करत आहेत या आंदोलनाचा एक टप्पा म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. अभिजीत दुर्गी, सरचिटणीस प्रा. संजय मोरे, उपाध्यक्ष शिवाजीराव होडगे, उपाध्यक्ष प्रा. अमरसिंह शेळके, प्रा. बी.के.मडिवाळ, अमित रेडकर, अमर चव्हाण, प्रकाश बोकडे, नितीन पोतदार, गंगाधर माळी ळ, अरविंद पाटील, विकास माने, प्रशांत मेधावी, व्ही टी कांबळे, शशिकांत खोराटे, विद्या शेवाळे, सोमलिंग तेली, अमर रजपूत आदींचा सहभाग होता
या आंदोलनात मार्गदर्शन करताना शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले, ' शिक्षण क्षेत्राविषयी सरकारची अनास्था दिसत आहे. दिवसेंदिवस शिक्षणावरील खर्च कमी केला जात आहे. सरकारची चुकीची शैक्षणिक धोरणे शिक्षण क्षेत्रासाठी मारक ठरत आहेत. ऑनलाइन संच मान्यतेचा निर्णय हा शिक्षकावर अन्यायकारक आहे. यामुळे शाळा बंद होण्याचा धोका संभवतो. ऑनलाईन संच मान्यतेच्या निर्णयाविरोधात शिक्षकांनी जे आंदोलन पुकारले आहे त्यामध्ये आपला कायम सहभाग असेल. संघटनेच्या आंदोलनाला आपला पाठिंबा राहील'