Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी महामंडळ करणार सरकारकडे पाठपुरावा, फेब्रुवारीत मराठी चित्रपट संमेलनअजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाणांची बदलीबांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानगांधीनगरमधील अनधिकृत  इमारती पूर्णपणे निष्कासित करा, माजी नगरसेवक संघटनेची मागणीविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यासाठी  तातडीने कारवाई करावी - ठेवीदारांची मागणी ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचे भर पावसात आंदोलन ! कौस्तुभ गावडे, दादासाहेब लाड यांचा पाठिंबा !!क्रीडाई कोल्हापूरतर्फे योग दिन साजराउद्धव ठाकरे अन् कार्यकर्त्यांमधील नाते घट्ट, फुटीर खासदारांना मतदार धडा शिकवतीलमहापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणारराज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरण

जाहिरात

 

बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

schedule23 Jun 26 person by visibility 32 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : यूकेमधील बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे 'मानव-एआय सहयोग' या विषयावर प्रभावी संशोधन केल्याने कसबा बावडयाची कन्या डॉ. वैभवी विजय चव्हाण यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला. युनायटेड किंगडममधील 'रेव्हन्सबोर्न युनिव्हर्सिटी लंडन' येथे त्या, प्रकल्प व्यवस्थापन विषयातील वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रमुख संशोधन आहेत. त्यांना अमेरिकेतील डेलावेअर राज्यातील 'युनिव्हर्सिटी ऑफ एडुस्कोप - प्रोफेशनल अँड सोशल रिसर्च'तर्फे प्रकल्प व्यवस्थापन विषयातील मानद डॉक्टरेट नुकतीच प्रदान करण्यात आली.

नवी दिल्ली येथील 'इंडिया इंटरनॅशनल सेंटर' येथे 'फेडरेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन' आणि 'युनिव्हर्सिटी ऑफ एडुस्कोप' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ग्लोबल क्लायमेट सस्टेनेबिलिटी लीडरशिप समिटमध्ये त्यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित केले. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे, अन्न, पर्यावरण, वन आणि वन्यजीव मंत्री सरदार मनजिंदर सिंग सिरसा यांच्या उपस्थितीत डॉ. चव्हाण यांना गौरवण्यात आले.

त्यांच्या संशोधनात एआय-सक्षम प्रकल्प वातावरणातील विश्वास, निर्णयक्षमता, सहयोग, प्रशासन आणि मानवी देखरेख यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच, प्रकल्प-आधारित संस्थांमध्ये जबाबदार पद्धतीने एआयचा समावेश करण्याबाबतच्या ज्ञानसाठ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. चव्हाण यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरावील सन्मानाने कोल्हापुरच्या शिरपेचात मानाच तुरा रोवला आहे. 

…………..

“हा सन्मान मी माझे वडील ॲड विजय शामराव चव्हाण व आई विभावरी चव्हाण यांना समर्पित करते. माझ्यावरील त्यांचा विश्वास, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचा बिनशर्त पाठिंबा हाच माझ्या आयुष्यातील प्रत्येक यशाचा पाया राहिला आहे. त्यांची मूल्ये, जिद्द आणि प्रोत्साहन यांनी मला शिक्षण, संशोधन आणि सेवा या क्षेत्रांत उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा दिली.” 
-
डॉ. वैभवी चव्हाण, संशोधक 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes