Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खडके अकॅडमी बोरपाडळेचा दहावीचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकालआबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केनूतन मराठी विद्यालयचा दहावीचा निकाल ८१ टक्केप्रकाश बेलवाडेंवर हल्ल्याचा प्रयत्न, एक जण जखमीकोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय ! तीन जिल्ह्यातील ९२८ शाळांचा निकाल शंभर टक्के ! !अशोक गाडे, दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्यावर कारवाईची मागणीयंग सिनीअर्सची रंग-रेषांची दुनिया ! शाहू स्मारक भवनमध्ये चित्र प्रदर्शन !! सत्तेत असताना सतेज पाटलांनी काय केले, आता आंदोलनाची नाटके कशासाठी – आमदार राजेश क्षीरसागरव्ही. बी. पाटलांचे मंत्री मुश्रीफांच्यावर गंभीर आरोप, भैया मानेंचा पलटवारद्रूतगती महामार्गावर ई चलनद्वारे बसधारकांची आर्थिक लूट, प्रदीप राठोडांचे सोमवारपासून आमरण उपोषण

जाहिरात

 

यंग सिनीअर्सची रंग-रेषांची दुनिया ! शाहू स्मारक भवनमध्ये चित्र प्रदर्शन !!

schedule08 May 26 person by visibility 43 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ते सगळे वयाची साठी ओलांडलेलेविविध क्षेत्रात काम केलेले.. वेगवेगळया ठिकाणी राहणारे. त्यांचा सत्तरहून अधिक जणांचा ग्रुप आहे. ‘ओल्ड इज गोल्ड’या नावांनी हा ग्रुप परिचित आहे. मात्र त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन, साऱ्यांना रंग आणि रेषांच्या दुनियेत रमणारे. चित्रकार. त्या प्रत्येकाची चित्रकारितेतील खासियत वेगळी. ‘ओल्ड इज गोल्ड ’ग्रुमधील चित्रकार अशोक धर्माधिकारी, अरुण सुतार आणि शिवाजी काटकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन कोल्हापुरात भरले आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथील कलादालन येथे सात ते ११ मे २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन आहे. सकाळी दहा ते रात्री आठ यावेळेत हे प्रदर्शन खुले असते.

या प्रदर्शनात जवळपास पन्नासहून अधिक कलाकृती आहेत. निसर्गचित्र, रचनाचित्रांचा समावेश आहे. चित्रकार अशोक धर्माधिकारी हे सिनीअर चित्रकार. वय वर्षे ८१. ते चित्रनिर्मिती, पेन्सिल सेडिंगचे काम करतात. कोल्हापुरातील स. म.लोहिया हायस्कूल येथून सेवानिवृत्त झाले आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, भवानी मंडप येथे रोज पेन्सिल स्केच करतात. प्रदर्शनात त्यांच्या १५ चित्रकृती आहेत.

अरुण सुतार हे व्यावसायिक चित्रकार आहेत. व्यक्तिचित्रमध्ये त्यांचा हातखंडा आहे. पूर्वी ते सिनेमा पोस्टर बनवित. खुदागवाह, हम अशा अनेक सिनमांचे पोस्टर तयार केले आहेत. कॅलेंडर डिझाइन करतात. पुणे, कागल, बेळगाव, इचलकरंजी, सांगली, नाशिक, कोल्हापुरात अशा विविध ठिकाणी प्रदर्शने भरविल आहेत. या प्रदर्शनात त्यांची वीस चित्रे आहेत. हौशी चित्रकार म्हणून शिवाजी काटकर यांची ओळख. राज्य सरकारच्या इरिगेशन विभागात ३५ वर्षे सेवा केली आहे. वॉल पेटिंग, स्प्रे पेटिंग, स्क्रीन प्रिटींगमध्ये कामे केली आहेत. २०२२ नंतर ते चित्रकला या विषयाकडे वळले. पेन्सिल सेडींग, रेखाचित्र, निसर्गचित्र रेखाटतात. या प्रदर्शनात त्यांच्या वीस कलाकृती आहेत.

दरम्यान बांधकाम व्यावसायिक आणी क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, महालक्ष्मी अॅपरल्सचे रवींद्र उबेरॉय, गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण नरके यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes