प्रकाश बेलवाडेंवर हल्ल्याचा प्रयत्न, एक जण जखमी
schedule08 May 26 person by visibility 242 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाशी संलग्न १२०० हून प्राथमिक दूध संस्थांची चौकशी करावी, गोकुळवर प्रशासक नेमावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असलेले गर्जना संघटनेचे प्रमुख प्रकाश बेलवाडे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. यावेळी वैभव यादव हे जखमी झाले आहेत. कागल चेक पोस्ट नाका येथे हा प्रकार घडला. यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एकजण चप्पल उगारत बेलवाडे यांच्याकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या देखत हा सारा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. बेलवाडे यांनी गेले काही दिवस गोकुळच्या राजकारणात गोकुळचे संचालक, तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र सोडले. अवसायन प्रक्रियेतील १२०० हून अधिक प्राथमिक दूध संस्थाची चौकशी करावी यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. सध्या या संस्थेची सुनावणी सुरू आहे. तसेच गोकुळवर प्रशासक नेमावा यासाठी ते प्रयत्न करत होते. शुक्रवारी त्यांना मारहाणीचा प्रकार घडला. यामध्ये एक जण जखमी झाला असे वृत्त आहे.