Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सरकारी कमिटीला सरकारच्याच आदेशाचा विसर !  पूररेषेच्या सर्व्हेक्षणाची मुदत उलटूनही समितीची ना बैठक…ना पाहणी, अहवाल तर लांबच ! !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजामुळे हजारो सभासद मतदानापासून वंचित, चित्रपट महामंडळात परिवर्तन गरजेचे पी. सावळाराम यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे, उपाध्यक्षपदी संजय शेटे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन ! रंगबहारर संस्थेसह चित्रपट व्यावसायिकही उपस्थित कोरे अभियांत्रिकीमध्ये पीबीएल दिन उत्साहातमहिला - बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा,  दीपा ठाणेकरांची सहपालकमंत्र्यांच्याकडे मागणीसिनेमा प्रदर्शनासाठी राज्यभरात ५०० मिनी थिएटर, कामगारांना पंचवीस टक्के वेतनवाढ, निर्मात्यांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्थायुवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णालंकारित तोरणाचे पूजन डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगला 25 लाखाची देणगी

जाहिरात

 

पी. सावळाराम यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे

schedule03 Jun 26 person by visibility 39 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: पी. सावळाराम हे जनकवी होते. त्यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे होते. श्रीकांत नरुलेजनकवी होते. त्यांच्या भावगीतातील सौंदर्य जनसामान्यांना आपलेसे करणारे होते. श्रीकांत नरुले यांच्या नव्या पुस्तकातून भावगीतांचे सौंदर्य उलगडून दाखवण्यात आले आहे, असे प्रतिपादन  लेखक, पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांनी केले.
चित्रपटकवी डॉ. श्रीकांत नरुले  लिखित 'पी. सावळाराम यांच्या भावगीतातील सौंदर्य' ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे हे प्रमुख पाहुणे होते. उत्कर्ष प्रकाशनाचे सुधाकर जोशी यांनी सोहळ्याचे आयोजन केले होते.
सामान्य माणसाचे भावजीवन सावळारामांच्या भावगीतातून उत्कटपणे प्रकट झालेले आहे असे सांगून डॉ. शिंदे यांनी कविता आणि भावगीतातील भेद आणि सौंदर्यस्थळांविषयी विवेचन केले. डॉ. नरुले यांनी आपल्या मनोगतात पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेविषयीचे चिंतन व्यक्त केले. आपल्या काव्य निर्मितीला 'पुढारी'कार  पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी उत्तेजन दिल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात डॉ. जी. पी. माळी, प्रा. बाबासाहेब पोवार, सुनील मुसळे, सुभाष माने, वीरेंद्र ऐदमाळे, स्नेहा वाबळे, रवींद्र चिवटे, चंद्रकांत देशमुख, सौ. चित्रादेवी देशमुख, विजय पोळ, बाळासाहेब भोसले, प्रमोद गिरी यांची भाषणे झाली. प्रसाद नरुले यांनी संयोजन केले. प्रा. दीपक जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes