Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संजय भोसलेंचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून नामंजूर, आयुक्तांनी निलंबित करावे – भूपाल शेटेटाकाऊतून टिकाऊ, भंगारातील गाडयांचे ट्रकमध्ये रुपांतर ! कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आयुक्तांची शाबासकी ! !काँग्रेसचे नगरसेवक धावले पंपिंग स्टेशनकडे, आयुक्त अधिकाऱ्यांकडूनही पाहणीपाण्याच्या उपलब्धतेच्या ठिकाणांवरील उपसाबंदी उठवावी, इरिगेशन फेडरेशनची मागणीटिक टिक वाजते डोक्यात… उलगडले घडयाळाशी जुळलेले बंध ! प्रकटला राजकारणापलीकडील कृतज्ञतेचा भाव !!जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ, २६६ खेळाडूंचा सहभागटीईटी परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज, शहरातील ५४ केंद्रावर ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्तीज्युनिअर कॉलेजच्या संचमान्यतेवरुन आमदारांचा हल्लाबोल ! शिक्षण आयुक्त हटवा...शिक्षण क्षेत्र वाचवा !!उत्साह, स्वागत - नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा  वाजली !  प्रवेशोत्सवासह नशामुक्त कोल्हापूरची शपथ !! चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले, उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदे

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीमध्ये पीबीएल दिन उत्साहात

schedule03 Jun 26 person by visibility 92 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पाधारित शिक्षण दिनाचा सोहळा उत्साहात  झाला.  या कार्यक्रमासाठी सीआयआयचे अध्यक्ष  वीरेंद्र पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांच्या हस्ते झाले. पीबीएल दिनानिमित्त आयोजित प्रकल्प प्रदर्शनामध्ये अभियांत्रिकीच्या सर्व शाखांतील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सुमारे २००० विद्यार्थ्यांनी ३५० हून अधिक प्रकल्प गटांच्या माध्यमातून आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, समस्या निराकरण कौशल्य आणि नवोपक्रमशील दृष्टिकोनाचे उत्कृष्ट दर्शन या प्रदर्शनातून घडले.

अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, पीबीएल समन्वयक प्रा. एस. व्ही. निकम तसेच प्रा. एम. व्ही.जाधव, प्रा. आर डी गाडे,  प्रा.आर आर चव्हाण, प्रा.एन एम शिंदे, प्रा .ए एन मलंगौडा, प्रा .ए ए पारेख, प्रा.ओ आर जंगम, प्रा.एस के जंत्रे,तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी वारणा पीबीएल पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा वीरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी, विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या प्रकल्पांचे उत्पादन विकास, उद्योजकता आणि स्टार्टअप्समध्ये रूपांतर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी विद्यार्थ्यांनी प्रकल्पाधारित शिक्षणाच्या माध्यमातून उद्योगजगताच्या गरजांशी सुसंगत कौशल्ये विकसित करावीत, असे आवाहन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes